अंदरसुल गाव कोरोना मुक्त करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 06:50 PM2020-09-18T18:50:05+5:302020-09-18T18:51:16+5:30

अंदरसुल : तालुक्यतील सर्वात मोठे व्यापारी पेठ असलेले अंदरसुल गाव कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोरोनामुक्तीसाठी आता, लोकसहभाग महत्वाचा असल्याची प्रतिक्र ीया व्यक्त केली जात आहे.

Public participation is important to liberate Andarsul village Corona | अंदरसुल गाव कोरोना मुक्त करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा

अंदरसुल गाव कोरोना मुक्त करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा

Next
ठळक मुद्देवारंवार प्रशासनाने सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी केली गेली नाही हे वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्क
अंदरसुल : तालुक्यतील सर्वात मोठे व्यापारी पेठ असलेले अंदरसुल गाव कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोरोनामुक्तीसाठी आता, लोकसहभाग महत्वाचा असल्याची प्रतिक्र ीया व्यक्त केली जात आहे.
अंदरसुल गावात येवला शहर व तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातून तसेच कोपरगाव, वैजापूर तालुक्यातून बँक, पतसंस्था यासाठी नागरिकांची सातत्याने वर्दळ असते. गावातील विविध चौकात नेहमीच वर्दळ असते. मात्र सद्या गावाच्या विघ्नेश्वर मंदिर ते पूर्वेकडील रामेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रु ग्ण आढळून आले. ग्रामस्थांनी गांभीर्याने न घेतल्याने, वारंवार प्रशासनाने सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी केली गेली नाही हे वास्तव आहे.
गावातील दुकानदार, ग्राहक व भाजी विक्र ेते यांनी आरोग्य खाते व प्रशासन यांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. गावातील प्रत्येक गल्लीत रु ग्ण आढळून येत आहेत. महात्मा फुले चौक वर्दळीचा भाग आहे, या चौकात भाजी विक्र ेते शारीरिक अंतर न राखता बसलेले असतात. अरु ंद रस्ता असल्याने कोणतेही नियम पाळले जात नाही. भाजीपाला विक्र ेते यांची आठवडे बाजारच्या जागेवर पत्र्याच्या शेडमध्ये शारीरिक अंतर राखून जागा अधोरेखित करून बसण्याची, तसेच मास्क व सॅनिटाईझरची सक्ती करून ग्रामपालिका प्रशासन यांनी अमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. तर माझे कुटुंब माझी सुरक्षा माझी जबाबदरी या तत्वावर आता लोकसहभाग आवश्यक आहे.

व्यापारी पेठेतील भाजीपाला बाजार आठवडे बाजारच्या ठिकाणी हलवून शासनाच्या नियमानुसार विक्र ेते व ग्राहक याना मास्क व सॅनिटाईझर वापर सक्ततीचे करून नियोजन काळाची गरज आहे.
- भिकाजी एंडईत, माजी सरपंच, अंदरसुल.

अंदरसुल गावात दोन महिन्यांपासून येथील प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद तारु व डॉ. प्रिया अहिरे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बोराडे व ग्रामपालिका प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील आशा सेविका तुटपुंज्या मानधन व मेहनताना तोही वेळेवर नाही अश्या परिस्थितीत जीवाची पर्वा न करता घरोघर जाऊन सर्वे करीत आहेत. मात्र, आता कोरोना रोखण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे.

Web Title: Public participation is important to liberate Andarsul village Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.