लोकप्रतिनिधी-अधिकाºयांमध्ये खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:49 AM2017-11-04T00:49:30+5:302017-11-04T00:49:30+5:30
तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेणारी बैठक प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यातील आरोप -प्रत्यारोपाने चांगलीच गाजली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नांदगाव : तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेणारी बैठक प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यातील आरोप -प्रत्यारोपाने चांगलीच गाजली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत कृषी विभाग, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाज पद्धतीवर टीकेची झोड उठली. तेव्हा भुसे यांना हस्तक्षेप करावा लागला. नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी थेट पालिका मुख्याधिकाºयांच्या कामाच्या पद्धतीचा पंचनामा सुरू केल्यावर भुसे यांनी नांदगावचे मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांना तुम्हाला बदली करून घ्यायची असेल तर करून घ्या. मात्र काम व्यवस्थित करा, असे सुनावले. नांदगाव व मनमाड नगरपालिका, पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम आदी विभागाच्या कार्यक्षमतेवरून आपला साचेबंद बचाव करीत होते तर पदाधिकारी जनतेची कशी अडवणूक होते. याचाच पाढा वाचत होते. तालुका कृषी अधिकारी अनुपस्थित होते. यावरून टीका झाली पं.स. उपसभापती सुभाष कुटे यांनी कृषी विभागाच्या योजनाचे वितरण नीट होत नाही. औषधे, खते, बियाणे या शासकीय योजनांची माहिती शेतकºयांना देत नाहीत. अनेक कृषी योजना जनतेला कळतच नाहीत असा गंभीर आरोप केला. बैठकीत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांच्या कार्याची तुलना इतर विभागाशी करीत सुधारण्याचा सल्ला भुसे यांनी दिला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांना काही वेळेस खोट बोलू नका, असा इशारा अधिकाºयांना देण्याची वेळ आली. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता पठाडे, रमेश बोरसे, सभापती सुमन निकम आदी उपस्थित होते.