फेरीवाला धोरणाबाबत लोकप्रतिनिधी अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:44 AM2018-03-03T00:44:40+5:302018-03-03T00:44:40+5:30

मनपाने फेरीवाला धोरण जाहीर केले, मात्र त्याबाबत नगरसेवकांना विश्वासात घेण्यात आले नसून एकप्रकारे हा अन्याय केला आहे. त्यामुळे आंदोलन करावे लागेल, असा इशारा प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी दिला.

 Public Representative Unaware of the Chapman Policy | फेरीवाला धोरणाबाबत लोकप्रतिनिधी अनभिज्ञ

फेरीवाला धोरणाबाबत लोकप्रतिनिधी अनभिज्ञ

googlenewsNext

नाशिकरोड : मनपाने फेरीवाला धोरण जाहीर केले, मात्र त्याबाबत नगरसेवकांना विश्वासात घेण्यात आले नसून एकप्रकारे हा अन्याय केला आहे. त्यामुळे आंदोलन करावे लागेल, असा इशारा प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी दिला. नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक सोमवारी दुपारी प्रभागाच्या सभागृहात सभापती सुमन सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठक सुरू होताच नगरसेवक सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, संतोष साळवे, डॉ. सीमा ताजणे आदींनी हॉकर्स झोनबाबत तक्रारींचा पाढा वाचला. मनपाने जे फेरीवाला झोन घोषित केले आहे ते चुकीच्या पद्धतीचे आहेत. सर्वत्र अस्वच्छता पसरली असून, स्वच्छता मोहीम राबवावी,अशी मागणी यावेळ करण्यात आली. बैठकीला नगरसेवक ज्योती खोले, सुनीता कोठुळे, मंगला आढाव, जयश्री खर्जुल, अंबादास पगारे, प्रा. शरद मोरे, पंडित आवारे, बाजीराव भागवत, सोमनाथ वाडेकर आदी उपस्थित होते. उद्यान, शेती वावर या ठिकाणीही असे क्षेत्र घोषित करण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. यामध्ये अनेकांवर अन्याय झाला असून, लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता फेरीवाला झोन जाहीर केले.

Web Title:  Public Representative Unaware of the Chapman Policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.