सोनाबे सोसायटीत जनसेवा पॅनल विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 11:13 PM2022-03-28T23:13:06+5:302022-03-28T23:15:06+5:30
ठाणगाव : सोनांबे विकास सोसायटीची निवडणूक होऊन जनसेवा पॅनलने बारा जागा जिंकून निर्वाचित वर्चस्व स्थापित केले. तर विरोधी समर्थ पॅनलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले तर एक जागा यापूर्वीच बिनविरोध निवडण्यात आली होती.
ठाणगाव : सोनांबे विकास सोसायटीची निवडणूक होऊन जनसेवा पॅनलने बारा जागा जिंकून निर्वाचित वर्चस्व स्थापित केले. तर विरोधी समर्थ पॅनलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले तर एक जागा यापूर्वीच बिनविरोध निवडण्यात आली होती.
सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार यांनी जनसेवा पॅनलची निर्मिती केली तर, माजी सरपंच केरु पवार यांनी समर्थ पॅनल तयार करुन दोघांमध्ये सरळ- सरळ लढत होऊन जनसेवा पॅनलने बारा जागांवर निर्वाचित वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सर्वसाधारण कर्जदार या गटातून जनसेवा पॅनलचे पंडित रामू घोडे , रामनाथ पांडुरंग डावरे , तानाजी रामभाऊ पवार , सुदाम आनंदा पवार , ज्ञानेश्वर बळवंत बोडके , ज्ञानेश्वर बाबूराव पवार , प्रवीण जयराम पवार , सुरेश निवृत्ती पवार हे विजयी झाले.
यादव भीमा घोडे, एकनाथ सुखदेव कडभाने, उत्तम गोविंद जगताप, भाऊसाहेब विठ्ठल पवार, पुंजा मुरलीधर पवार, सदाशिव रंभू पवार, वामन तुकाराम पवार, पिरअहमद पापामिया पठाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले. महिला राखीव गटातून जनसेवा पॅनलच्या द्रौपदाबाई कारभारी बोडके (३३५), राधाबाई दुर्गेश पवार (३५१) या विजयी झाल्या तर समर्थ पॅनलच्या पुष्पाबाई संपत बोडके व मिराबाई एकनाथ पवार यांचा पराभव झाला. अनुसूचित जाती जमाती मधून समर्थ पॅनलचे गोविंद जगन्नाथ डगळे (३४९) हे एकमेव विजयी झाले तर जनसेवाचे दत्तू विठोबा डगळे यांचा पराभव झाला.
इतर मागास प्रवर्ग गटातून जनसेवा पॅनलचे खंडू पंढरी पवार (३४८) हे विजयी झाले तर, समर्थचे जनार्दन लक्ष्मण पवार यांचा पराभव झाला. भटक्या जाती विमुक्त जमाती मधून रामभारती नामदेव गोसावी हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विष्णू वारुंगसे, नाना पवार, शंकर पवार, किरण घोडे, ज्ञानेश्वर पवार, ज्ञानेश्वर बोडके, दामू बोडके, संजय बोडके विकास पवार,सुभाष जोर्वे,योगेश पवार, विकास पवार, कैलास पवार, शरद कडबाने,योगेश पवार,राजाराम पवार आदींनी जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनीता लोखंडे यांनी काम पाहिले.
सोनांबे विकास सोसायटीच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलने बारा जागा जिंकून निर्वाचित वर्चस्व मिळविल्यानंतर जल्लोष करतांना जनसेवा पॅनलचे नेतृत्व करणारे डॉ. रवींद्र पवार, विकास पवार, विष्णू वारुंगसे, नाना पवार आदी. (२८ सोनांबे)