‘नो हायपर टेन्शन’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 AM2021-09-16T04:20:04+5:302021-09-16T04:20:04+5:30
नाशिक : कमी वयात कारकीर्द घडविण्याच्या प्रयत्नात युवा पिढीला मोठ्या प्रमाणात ताणतणावांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच त्यांच्यात हृदयविकारांच्या ...
नाशिक : कमी वयात कारकीर्द घडविण्याच्या प्रयत्नात युवा पिढीला मोठ्या प्रमाणात ताणतणावांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच त्यांच्यात हृदयविकारांच्या प्रमाणात वाढ झाल्याने हे वाढीचे प्रमाण रोखण्यासाठी हृदयतज्ज्ञ डॉ. अतुल पाटील यांनी लिहिलेल्या ‘नो हायपर टेन्शन’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देशात २५ ते ३० टक्के आहे, अशी माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लॅनसेट या वैद्यकीय पत्रिकेत प्रसिद्ध झाली. त्याचा संदर्भ घेऊन डॉ. अतुल पाटील म्हणाले, कमी वयात हृदयासंबंधी आजारांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तसेच उच्च रक्तदाबाविषयी म्हणावी तशी जागृती नाही. अयोग्य आहार, व्यायाम तसेच योगाचा अभाव, लठ्ठपणा, घातक पदार्थांचे व्यसन यासह मधुमेह यामुळे हृदयरोगींचे प्रमाण वाढले आहे. हृदयरोग, उच्चरक्तदाब यासंंबंधी जागृती आणि प्रबोधन गरजेचे वाटले म्हणून पुस्तक लिहिण्यास घेतल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.