‘अपरिचित महाभारत’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:00 AM2018-03-09T01:00:23+5:302018-03-09T01:00:23+5:30
नाशिक : महाभारतातील अनेक अपरिचित घटनाक्रम व प्रसंग अद्यापही समोर न येऊ शकलेल्या गोष्टींवर प्रकाशझोत टाकणाºया वासंती देशपांडे लिखित ‘अपरिचित महाभारत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
नाशिक : महाभारतातील अनेक अपरिचित घटनाक्रम व प्रसंग अद्यापही समोर न येऊ शकलेल्या गोष्टींवर प्रकाशझोत टाकणाºया वासंती देशपांडे लिखित ‘अपरिचित महाभारत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित प्रकाशन सोहळ््यात ज्येष्ठ साहित्यिक संजय जोशी व रविप्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने महाभारतातील असे घटनाक्रम जे महाभारताचे वर्णन करण्याºया पुस्तकात समाविष्ठ होऊ शकलेले नाही, त्यांचे वर्णन केले असून, श्रीकृष्ण अर्जुन संवादापर्यंत न थांबता आतापर्यंत सर्वपरिचित होऊ न शकलेल्या घटनाक्रम व प्रसंगांचा समावेशही या पुस्तकात केला असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. प्रमोद पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.