उमराणेत पीक माहिती पत्रकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:55+5:302021-09-15T04:17:55+5:30
उमराणे : हिंदवी स्वराज्याचे सर्वस्व पणाला लावणारे शुरवीर योद्धा जिवा महाला यांच्या स्मरणार्थ येथील जाणता राजा मित्रमंडळातर्फे महाराष्ट्र शासनाच्या ...
उमराणे : हिंदवी स्वराज्याचे सर्वस्व पणाला लावणारे शुरवीर योद्धा जिवा महाला यांच्या स्मरणार्थ येथील जाणता राजा मित्रमंडळातर्फे महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना सातबारावर पीक पाहणी लावण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. या ॲपचे माहिती पत्रकाचा प्रकाशन समारंभ नुकताच झाला.
ई-पीक पाहणी ॲपची संपूर्ण माहिती असलेले पत्रक उद्योजक कैलास देवरे यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आले. अध्यक्षस्थानी ई-सेवा केंद्राचे संचालक देवा पगार हे होते. ई-पीक पाहणी ॲप संदर्भात मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी मोबाइलद्वारे पीक पाहणी कशी करावी, अशा माहितीचे पाच हजार पत्रक शेतकऱ्यांच्या घरोघरी येत्या ७२ तासांच्या आत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले. हा उपक्रम राबविण्यासाठी प्रभारी तहसीलदार बनसोडे, नायब तहसीलदार काथेपुरे व मंडळ अधिकारी बागुल यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्केट कमिटीचे माजी सभापती विलास देवरे, शेतकी संघाचे चेअरमन संदीप देवरे, वसाकाचे माजी संचालक बारकू देवरे, माजी सरपंच दत्तू देवरे, ई-सेवा केंद्राचे संचालक जयवंत पाटील, भिला देवरे, बापू देवरे, कौतिक देवरे, ललित देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी नंदन देवरे व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
------------------
उमराणेत पीक पाहणी माहिती पत्रिकेचे वितरण करताना कैलास देवरे, नंदन देवरे उपस्थित नागरिक. (१४ उमराणे)
140921\14nsk_17_14092021_13.jpg
१४ उमराणे