‘पर्णालपर्वतग्रहणाख्यान’ दुर्मिळ ग्रथांचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 05:54 PM2018-12-30T17:54:38+5:302018-12-30T17:54:54+5:30
सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथील श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशन व दुर्गभ्रमणगाथा समूह यांनी पर्णालपर्वतग्रहणाख्यान संस्कृत काव्याचे मराठी भाषांतर असलेल्या नवीन स्वरूपातील ग्रंथाचे सासवड जवळील ढवळगडावर इतिहास अभ्यासक सचिन जोशी यांच्या हस्ते पुनर्प्रकाशन करण्यात केले.

नवीन इतिहास संशोधकांना या ग्रंथाचा चांगला उपयोग होईल असा विश्वास श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशनचे अंकुर काळे यांनी व्यक्त केला. जयराम पिंडे हा एक विद्वान संस्कृत काव्यपंडित बंगलोर येथे शहाजी महाराजांच्या पदरी होता. त्यांनी असंख्य संस्कृतकाव्ये लिहिली. त्यापैकी ‘पर्णालपर्वतग्रहणाख्यान’’ हे संस्कृत काव्य शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना त्यांच्या तंजावर येथील सरस्वती महालात ऐकविले. त्यातून ते शिवचिरत्रातील काही पदर उलगडतात, असे यावेळी काळे यांनी सांगितले.