रामनामाची अमृतधारा ग्रंथाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:57 PM2017-09-24T23:57:47+5:302017-09-25T00:15:34+5:30
निसर्गात राम शोधून पर्यावरणाचा होणार ºहास रोखून श्रीरामाची पूजा करता येते. आपला गाव, तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ असेल तर ईश्वर आपल्या सान्निध्यात वास करतो. स्वच्छतेबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची शपथ सर्व साधकांनी घेण्याचे आवाहन अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती यांनी केले.
त्र्यंबकेश्वर : निसर्गात राम शोधून पर्यावरणाचा होणार ºहास रोखून श्रीरामाची पूजा करता येते. आपला गाव, तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ असेल तर ईश्वर आपल्या सान्निध्यात वास करतो. स्वच्छतेबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची शपथ सर्व साधकांनी घेण्याचे आवाहन अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती यांनी केले. श्रीराम शक्तिपीठाचे पीठाधीश्वर श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती लिखित रामनामाची अमृतधारा खंड ३ या ग्रंथाचे शनिवारी सागरानंद स्वामी सरस्वती यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी निरंजनी आखाड्याचे केशवानंदपुरी महाराज, महंत शंकरानंद महाराज, श्रीनाथानंद सरस्वती, सिद्धेश्वरानंद महाराज यांच्यासह दहा आखाड्यांचे प्रतिनिधी, स्वामी, पर्यावरण संस्थेचे विजयराजे धुमाळ, भाजपा सरचिटणीस लक्ष्मण सावजी, विक्रम नागरे, संजय गोडसे, प्रकाश देशमुख आदी उपस्थित होते. महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले की, रामनामाची अमृतधारा हा ग्रंथ साधकांच्या हाती देताना हनुमंतरायाला आनंद होत असेल. यात निसर्गात, स्वच्छतेत राम असल्याचे विश्लेषण करण्यात आले असून, निसर्गात राम असल्याने साधकांनी निसर्गाचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दीपप्रज्वलनाने कार्यक्र माची सुरुवात झाली. यानंतर एका कुमारिकेचे पूजन करण्यात येऊन साधू- संतांसह उपस्थित मान्यवरांचे पूजन करण्यात आले. यावेळी साधकाची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. श्रीराम पीठातील साधक आदित्य जाधव यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक दाखवत मनोभावे सेवा केल्यास फलप्राप्ती होते या आशयाचे नाटक सादर करून उपस्थितांचीे मने जिंकली. बेझे येथील श्रीराम शक्तिपीठ येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.