यार्दी सरांच्या ‘स्मृती सहल’ स्मरणिकेचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:40+5:302021-09-27T04:15:40+5:30
नाशिक : बिटकोतील अनेक पिढ्यांच्या आयुष्याचा शैक्षणिक पाया आणि शाळेबाहेरचे विश्व विस्तारण्यात यार्दी सरांचे योगदान अत्यंत मोलाचे होते, असे ...
नाशिक : बिटकोतील अनेक पिढ्यांच्या आयुष्याचा शैक्षणिक पाया आणि शाळेबाहेरचे विश्व विस्तारण्यात यार्दी सरांचे योगदान अत्यंत मोलाचे होते, असे प्रतिपादन प्राचार्य विजय सोहोनी यांनी केले. यावेळी ज्येष्ठ चित्रकार रामदास महाले, भीमराज सावंत, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, विलास प्रधान यांच्या उपस्थितीत कमलाकर यार्दी सरांच्या स्मृतिपर साकारलेल्या ‘स्मृती सहल’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
येथील डी.डी. बिटको बॉइज स्कूलच्या सभागृहात पुस्तक प्रकाशनासह जिल्हास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळादेखील पार पडला. यावेळी बोलताना प्राचार्य सोहोनी यांनी गत ३० वर्षे प्राचार्य पद सांभाळताना माझ्या नजरेसमोर सदैव यार्दी सरांचा आदर्श होता, असेही नमूद केले. यावेळी सरांचे माजी विद्यार्थी म्हणून प्रकाश अकोलकर आणि विलास प्रधान यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांच्या मनोगताचे वाचन भारती चंद्रात्रे यांनी केले. राजेश सावंत यांनी कलाध्यापक आणि स्पर्धा प्रमुख म्हणून चित्रकला स्पर्धेची माहिती दिली. त्यानंतर चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसाद दुसाने यांनी गुरुस्तवन तर स्वागत आणि प्रास्ताविक रवींद्र कदम यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेच्या सहसचिव नेहा मुळे यांनी करून देत त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती दिली. अमृता कविश्वर यांनी सूत्रसंचालन तर भास्कर कविश्वर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संजय मालुसरे, कौस्तुभ देशपांडे, किरण कविश्वर, राजेश सावंत, अभया देशपांडे, अनघा यार्दी, मधुवंती देशपांडे, अमृता कविश्वर यांनी विशेष परिश्रम घेऊन स्मरणिकेसह कार्यक्रमाचे आयोजन केले.
इन्फो
लघुपटाने उलगडला आठवणींचा पट
यार्दी सरांच्या जीवनावर बनविण्यात आलेल्या लघुपटाचे प्रसारण यावेळी करण्यात आले. पाच दशकांपूर्वीपासूनच्या सरांच्या कार्यकर्तृत्वाचा पट त्यातून उलगडण्यात आल्याने उपस्थित अनेक जुन्या विद्यार्थ्यांना यार्दी सरांच्या आठवणींचा जणू पटच उलगडला गेला. यावेळी १९६२ पासूनचे सरांच्या बॅचचे विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो
२६यार्दी