लोकमत कालदर्शिकेचे उत्साहात प्रकाशन

By admin | Published: November 28, 2015 10:43 PM2015-11-28T22:43:24+5:302015-11-28T22:43:52+5:30

लोकमत कालदर्शिकेचे उत्साहात प्रकाशन

Publications of the Lokmat Calender | लोकमत कालदर्शिकेचे उत्साहात प्रकाशन

लोकमत कालदर्शिकेचे उत्साहात प्रकाशन

Next

नाशिक : तिथी, सण, वार आणि अन्य परिपूर्ण माहिती असलेल्या ‘लोकमत कालदर्शिका-२०१६’चा प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दैनंदिन जीवनात कालदर्शिकेची सर्व माहिती नागरिकांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
तिडके कॉलनीत एस.एस.के. हॉटेलमध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास अशोका ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अशोक कटारिया, स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक पतितपावन नंदा, एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक प्रदीप शेनॉय, नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजीव नारंग, इन्स्टिट्यूटस् आॅफ इंजिनिअर्स इंडियाचे अध्यक्ष मनीष कोठारी, नाशिक महापालिकेचे मुख्यअग्निशामक अधिकारी अनिल महाजन, जीवन विद्या मिशन चळवळीतील ज्येष्ठ साधक शांताराम काळे, जयंत जोशी, संजय जोशी, सुरेश देवरे, पवार बुक डेपोचे संचालक अतुल पवार, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून प्रकाशित करण्यात आलेली कालदर्शिका ही परिपूर्ण माहिती तसेच मान्यवरांचे लेख यामुळे वाचकांच्या पसंतीस उतरली
आहे. सणवारांची माहिती आणि मान्यवरांच्या लेखाचा समावेश असलेली ही कालदर्शिका यंदाही नागरिकांना उपयुक्त ठरेल, असे मत प्रकाशनाच्या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
सदरची लोकमत कालदर्शिका विक्रीसाठी सर्वत्र उपलब्ध
आहे. (प्रतिनिधी)
अशी आहेत वैशिष्ट्ये..
यंदाची लोकमत कालदर्शिका २०१६ वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात आध्यात्म, आरोग्य, वास्तू, करियर, पाककृती, सौंदर्य, तिथी, पंचांग, मुहूर्त, भविष्य या विषयांवरील मान्यवरांचे माहितीपूर्ण लेख आहेत. यामध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी, सदगरूवामनराव पै, राशीचक्रकार शरद उपाध्ये यांचे ‘आध्यात्म जीवन आणि भौतिकता’ या विषयावर विचार असून, ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ आणि मुंबई येथील जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी नेत्रविकार आणि त्यावरील उपचारांविषयी मार्गदर्शन केले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सौंदर्यविषयक, अभिनेता प्रशांत दामले यांचे पाककृतीवर लिखाण आहे. तसेच अरुण नलावडे, परम संगणकाचे निर्माता व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, चाणक्य मंडळाचे अविनाश धर्माधिकारी, डॉ. सुभाष पवार यांचे लेख आणि गुरुनाथ तेंडुलकर यांच्या कथेचा समावेश आहे.

 

 

Web Title: Publications of the Lokmat Calender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.