जिल्ह्यात ३ फेब्रुवारीला पल्स पोलिओ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:24 AM2019-01-12T01:24:29+5:302019-01-12T01:25:33+5:30

पुढील महिन्यात म्हणजेच दि. ३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत नियोजन करण्यात आले.

Pulse Polio campaign in the district on 3rd February | जिल्ह्यात ३ फेब्रुवारीला पल्स पोलिओ मोहीम

जिल्ह्यात ३ फेब्रुवारीला पल्स पोलिओ मोहीम

Next

नाशिक : पुढील महिन्यात म्हणजेच दि. ३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत नियोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच योत्या दि. ३ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्सपोलिओ लसीकरणाबाबत नियोजन करण्यात आले. ग्रामीण स्तरावर ४ लक्ष १३ हजार ७६ एवढ्या अपेक्षित लाभार्थ्यांसाठी ३,१७१ बुथ उभारण्यात येणार असून, त्या ठिकाणी ८,११० आरोग्य कार्यकर्त्यांमार्फत मुलांना लस देण्यात येणार आहे.
बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, डॉ. अनंत पवार, जिल्हा बालरोगतज्ज्ञ डॉ. पंकज गाजरे आदी उपस्थित होते.

Web Title: Pulse Polio campaign in the district on 3rd February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.