शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:14 AM2019-09-02T00:14:27+5:302019-09-02T00:14:48+5:30
पाटोदा : केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार शेतकरीवर्गाने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सर्वच शेतमालाची विक्री रक्कम रोखीऐवजी आरटीजीएस व एनईएफटी प्रणालीद्वारे बँक खात्यावर जमा करण्याचे धोरण हे अन्यायकारक असून, यामुळे शेतकरीवर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. शासनाचे हे धोरण म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्याने या धोरणात बदल करून वीस हजारांच्या आतील रक्कम बाजार समितीत रोख स्वरूपात मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारने रविवारी (दि.१) बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचे सर्व पैसे बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शासनाच्या या नवीन धोरणामुळे लहान-मोठ्या सर्वच शेतकºयांचे हाल होणार आहे. जर एखाद्या शेतकºयाने बाजार समितीत दोन अडीच क्विंटल माल विक्र ीसाठी आणला व त्याचे तीन चार हजार रुपये आले तर ही रक्कम घेण्यासाठी शेतकºयांना बँकेत चकरा माराव्या लागणार आहे.
एवढे करूनही जर रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा झाली नाही तर पुन्हा व्यापाºयांकडे जाऊन चौकशी करावी लागणार असल्याने यातून शेतकºयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच वेळेचा अपव्यय होणार असल्याने शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून लहान शेतकºयांना शेतमाल विक्र ीची रक्कम रोख स्वरूपात मिळावी.शासनाचा हा निर्णय लहान शेतकºयांसाठी अन्यायकारक आहे. शासनाने या निर्णयात फेरबदल करून वीस हजारांहून कमी रक्कम रोख स्वरूपात द्यावी. दोन-चार हजार रु पयांसाठी शेतकरी बांधवाला बँकेत चकरा माराव्या लागणार आहे. लहान रक्कम रोख स्वरूपात द्यावी व मोठी रक्कम असेल तरच बँकेत ट्रान्स्फर करावी.
- मोहन शेलार, सभापती,
उपकृषी उत्पन्न बाजार समिती, पाटोदा शासनाचे हे धोरण योग्य असून, शेतकºयांच्या खात्यावर शेतमाल विक्र ीची रक्कम बँक खात्यात परस्पर जमा होणार आहे; मात्र ही रक्कम शेतमाल विक्र ी झालेल्या दिवशीच खात्यावर जमा व्हावी. शेतकºयांना व्यापाºयांकडे हेलपाटे मारण्याची वेळ येऊ देऊ नये. शेतकºयांकडे असलेले कर्ज बँकांनी खात्यातून परस्पर वळते करू नये तरच हे धोरण शेतकरी हिताचे ठरेल.
- समाधान सावंत, शेतकरी, खैरगव्हाणसरकारचे हे शेतमाल विक्र ी धोरण हे शेतकरी हिताचे असले तरी लहान शेतकºयांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. शेतमालाची रक्कम खात्यावर जमा झाली तरी बँक शेतकºयांकडे असलेल्या कर्जापोटी ही रक्कम परस्पर वळती करीत असल्याने शेतकरी अडचणीत सापडणार असल्याने शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात मिळावी. - भास्कर नाना शेळके,
शेतकरी, ठाणगावशेतमाल विक्र ीची रक्कम परस्पर बँक खात्यावर जमा होणार असल्याने व्यापाºयांकडून होणारी फसवणूक यामुळे टळणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करतो.
- उत्तम पाचपुते, शेतकरी, पाटोदा