नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 05:57 PM2020-10-26T17:57:48+5:302020-10-26T17:58:11+5:30
पेठ : गत आठवडयात झालेल्या अवकाळी पावसाने भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसानग्रस्त पिकांचे महसूल, कृषी व पंचायत समितीच्या संयूक्त समितीद्वारा पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी १४५ महसूली गावातील शिवारात ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यावर पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पेठ तालुक्यात या वर्षी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून अवकाळी पावसाने उरले सुरले सर्व काही हिरावून नेल्याने आदिवासी बळीराजा मेटाकूटीस आला असून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून वस्तू निष्ठ अहवाल सादर करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
तहसीलदार संदिप भोसले, तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या संयूक्त स्वाक्षरीने आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.