पुणे- भुसावळ  झाली आता दौंड- भुसावळ विशेष गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 01:26 AM2021-05-27T01:26:32+5:302021-05-27T01:27:37+5:30

पुणे आणि भुसावळदरम्यान धावणारी विशेष साप्ताहिक रेल्वे २९ जुलैपर्यंत दौंड ते भुसावळदरम्यान धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Pune-Bhusawal is now Daund-Bhusawal special train | पुणे- भुसावळ  झाली आता दौंड- भुसावळ विशेष गाडी

पुणे- भुसावळ  झाली आता दौंड- भुसावळ विशेष गाडी

googlenewsNext

मनमाड : पुणे आणि भुसावळदरम्यान धावणारी विशेष साप्ताहिक रेल्वे २९ जुलैपर्यंत दौंड ते भुसावळदरम्यान धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुणे-भुसावळपर्यंत धावणारी साप्ताहिक एक्‍स्प्रेस २७ मे ते २९ जुलै या कालावधीत दौंड-भुसावळ- दौंडदरम्यान धावणार आहे. २९ जुलैपर्यंत दर गुरुवारी एक्‍स्प्रेस भुसावळहून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून, दौंड येथे ३ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे, तर दौंडहून दर गुरुवारी एक्‍स्प्रेस १२ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, ८ वाजून ४५ मिनिटांनी भुसावळला   पोहोचणार आहे.  या गाडीला जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर या स्थानकांत थांबे  असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Web Title: Pune-Bhusawal is now Daund-Bhusawal special train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.