रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरीमुळे ‘पुणे-नाशिक सुपरफास्ट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 AM2021-03-09T04:18:02+5:302021-03-09T04:18:02+5:30

नाशिक : प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या प्रस्तावाला राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याने प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत ...

'Pune-Nashik Superfast' due to approval of railway proposal! | रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरीमुळे ‘पुणे-नाशिक सुपरफास्ट’!

रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरीमुळे ‘पुणे-नाशिक सुपरफास्ट’!

Next

नाशिक : प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या प्रस्तावाला राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याने प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेला हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात आता मार्गी लागू शकणार आहे. या नवीन मार्गामुळे नाशिक-नगर-पुणे हे अंतर रेल्वेने अवघ्या दोन ते अडीच तासात तासात पोहोचणे नजीकच्या भविष्यात शक्य होऊ शकणार आहे.

राज्यातील रेल्वे मार्गाला गती देण्याच्या उद्देशाने राज्याच्या काही भागातील रेल्वे प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) यांनी तयार केलेल्या आराखड्याला दोन महिन्यांपूर्वीपासूनच गती देण्यात आली होती. नाशिक आणि पुणे हे दोन जिल्हे मुंबईच्या सुवर्णत्रिकाेणातील महत्त्वाचे घटक आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांची चांगली प्रगती झाली आहे. मात्र, रेल्वेचा थेट मार्ग नसल्याने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गतिमान रेल्वेचा पर्याय उपलब्ध नव्हता. नाशिक-पुणे रेल्वेमार्गाची यापूर्वीदेखील अनेकदा सर्वेक्षणे झाली होती. मात्र, सर्वेक्षणानंतर सर्व कामे पुन्हा थंड बस्त्यात गेली. हा मार्ग पुणे-नगर-नाशिक असा राहणार असल्याने पुण्याहून शिर्डीला लवकर जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांचीदेखील सोय होऊ शकणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर अखेर राज्य मंत्रिमंडळात या प्रकल्पाची घोषणा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

इन्फो

२० टक्के भार उचलण्यास राज्याची मंजुरी

पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला रेल्वे बोर्डाने यापूर्वीच मंजुरी दिली होती. आता राज्य शासनाने या प्रकल्पातील खर्चापैकी २० टक्के म्हणजेच ३ हजार २०८ कोटी रुपयांचा वाटा उचलण्याची तयारी राज्य शासनाने दाखवली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत पुणे-नाशिक या थेट मार्गावर रेल्वे धावू शकणार आहे. गत दोन दशकांपासून सातत्याने या प्रकल्पाबाबत विविध स्तरावरून पाठपुरावा केला जात होता. त्या प्रयत्नांना सुरुवात होण्यास नवीन दशक उजाडले आहे.

इन्फो

देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे

नाशिक आणि पुणे या दोन्ही महानगरांदरम्यान देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे भविष्यात धावणार आहे. हा सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प केंद्र, राज्य सरकार आणि वित्तीय संस्थांच्या भागीदारीतून उभा राहणार आहे. १६ हजार कोटींच्या या सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी २०-२० टक्के आणि वित्तीय संस्था ६० टक्के गुंतवणूक करणार आहेत.

इन्फो

असा असेल २३५ किलोमीटरचा मार्ग

सेमी हायस्पीड रेल्वेबरोबरच सध्याची प्रवासी आणि मालगाडी धावण्यासाठी या २३५ किलोमीटर मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. ब्रॉडगेज मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पहिल्यांदाच तयार केला जाणार आहे. पुणे, चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक असा हा मार्ग राहण्याची शक्यता आहे. नाशिक, पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार आहे.

इन्फो

अशा रचनेचा प्रस्ताव

पुणे ते हडपसर हा मार्ग एलिव्हेटेड राहणार असून हडपसर ते नाशिक मार्ग भूभागावर राहणार आहे. २३५ किलोमीटरच्या या मार्गात १८ बोगदे प्रस्तावित आहेत. रेल्वे फाटकावर क्रॉसिंगची समस्या टाळण्यासाठी ४१ उड्डाण पूलदेखील प्रस्तावित आहेत. सेमी हायस्पीड रेल्वे वेगाने धावण्यासाठी अत्याधुनिक रचना असणारे ६ डबे प्रारंभीच्या काळात ठेवण्याचा प्रस्ताव असून त्यानंतर आवश्यकतेनुसार डब्यांची संख्या १२ ते १६ पर्यंत वाढविली जाणार आहे.

इन्फो

प्रस्तावित रेल्वे मार्गाची वैशिष्ट्ये

* रेल्वेमार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक या ३ जिल्ह्यातून जाणार

* रेल्वेचा वेग २०० किलोमीटर प्रति तास ठेवण्याचा प्रस्ताव

* पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानकांची आखणी

* मार्गात १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल, १२८ भूयारी मार्ग प्रस्तावित

Web Title: 'Pune-Nashik Superfast' due to approval of railway proposal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.