पुण्याचा संघ फिरत्या चषकाचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:39 PM2020-02-12T23:39:24+5:302020-02-12T23:48:13+5:30
म. गांधी विद्यामंदिर संचलित मसगा महाविद्यालयात आयोजित लोकनेते व्यंकटराव हिरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचा समारोप झाला. स्पर्धेत राज्यभरातील सुमारे १७४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या संघाने फिरता चषक पटकावला.
मालेगाव : म. गांधी विद्यामंदिर संचलित मसगा महाविद्यालयात आयोजित लोकनेते व्यंकटराव हिरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचा समारोप झाला. स्पर्धेत राज्यभरातील सुमारे १७४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या संघाने फिरता चषक पटकावला.
बलात्कारांना केवळ देहान्त हेच प्रायश्चित हा स्पर्धेचा विषय होता. अॅड. प्रार्थना सदावर्ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्राचार्य डॉ. दिनेश शिरुडे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक व निमगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य भाऊसाहेब गमे, संतोष तांबे, शिवानंद हाळे, डॉ. प्रशांत सूर्यवंशी, प्राचार्य उज्ज्वला देवरे, डॉ. अशोक कुमार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. विनोद गोरवाडक, प्रा. मीनाक्षी पाटील, प्रा. सादिया परवीन यांनी केले. प्रा. आर. डी. देसले यांनी आभार मानले. परीक्षक म्हणून डॉ. बाबासाहेब कोकाटे, विवेक चित्ते व तुषार शिल्लक यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल
उर्दू भाषा : प्रथम- मारीया तहसीन खालीद (मसगा महाविद्यालय), द्वितीय मोमीन मुद्दसेरा मो. इद्रीस (महिला महाविद्यालय, कॅम्प), तृतीय मुब्बशीराबानो रहमत खान (सिटी कॉलेज, मालेगाव).
अहिराणी भाषा : प्रथम- कल्पेश संजय माळी (भाऊसाहेब एमएसपाटील कॉलेज धुळे), द्वितीय प्रियंका खैरनार (महिला महाविद्यालय, कॅम्प), तृतीय दिपाली अशोक देवरे (मसगा महाविद्यालय).
इंग्रजी भाषा : प्रथम- अनिकेत सुनित सावंत (एम.पी. लॉ कॉलेज औरंगाबाद), द्वितीय आशुतोष रमेश बच्छाव, तृतीय तहसिनबेगम अब्दुल (दोन्ही मसगा महाविद्यालय).
हिंदी भाषा : प्रथम- कल्याणी दौलत जाधव (मसगा महाविद्यालय), द्वितीय अक्षय अजय सुरोसे (फुलसिंग नाईक महाविद्यालय,पुसद), तृतीय- श्वेता चंद्रकांत जैन (विद्यावर्धीनी कॉलेज, धुळे).
मराठी भाषा : प्रथम- महेश गणेश अहिरे (मसगा महाविद्यालय), द्वितीय संदीप राजेंद्र गवळी (मसगा महाविद्यालय), तृतीय स्वाती शांतीलाल सूर्यवंशी (महिला महाविद्यालय कॅम्प).
सर्वोेत्कृष्ट पारितोषिक : प्रथम- प्रसाद देवीदास जगताप, द्वितीय- धर्मेश साहेबराव देवरे (दोन्ही विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे) तर तृतीय वैष्णवी धनराज बच्छाव (महिला महाविद्यालय). सर्वोत्कृष्ट महिला स्पर्धक कल्याणी मधुकर काकडे (माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज, औरंगाबाद), चषक विजेता संघ- निखिल संभाजी बेलाटे व अश्विनी जयराम तावरे (आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे).