पुणेगावचे पाणी पोहचले ४४ किमीपर्यंत

By admin | Published: August 29, 2016 01:44 AM2016-08-29T01:44:03+5:302016-08-29T01:44:47+5:30

पाटोदा : पुढील तीन दिवसात दरसवाडीत पोहचण्याची शक्यता

Pune water reached 44 km | पुणेगावचे पाणी पोहचले ४४ किमीपर्यंत

पुणेगावचे पाणी पोहचले ४४ किमीपर्यंत

Next

पाटोदा : गेल्या ४४ वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याच्या चाचणीसाठी २६ आॅगस्टला दुपारी ४ वाजता पाणी सोडण्यात आले असून, आज (२८ आॅगस्ट) सायंकाळपर्यंत हे पाण्याने विना अडथळा सुमारे ४४ किलोमीटर अंतर (बहादुरी बोगदा) पार केले आहे. सध्या कडवा कालवा विभागातून ९० क्यूसेकने पाण्याचा चाचणीसाठी विसर्ग सुरू असून, हे पाणी दरसवाडी धरणात पोहचण्यात अजून २२ किलोमीटर अंतर बाकी आहे. हे अंतर येत्या तीन चार दिवसात पूर्ण होऊन दरसवाडीत पोहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुणेगावमधून दरसवाडीपर्यंत जरी पाणी सोडले असले तरी अद्याप या कालव्याची पाण्याची पहिलीच चाचणी असल्याकारणाने पाण्याचे परक्युलेशन किती प्रमाणात होते यावर बरेच काही अवलंबून आहे. दरसवाडी धरणापासून ते पाठीमागे २० किलोमीटर अंतराची अद्याप कोणतीच चाचणी झालेली नाही. त्यामुळे दरसवाडी धरणात पाणी पोहचणे हीच खरी परीक्षा आहे. पुणेगाव धरणातून चाचणीसाठी सुमारे २०० एमसीपीटी पाणी दिले जाणार आहे. दरसवाडी धरणाची क्षमता १०८ एमसीपीटीची असून, आज रोजी दरसवाडी धरणात सुमारे ६८ एमसीपीटी पाणी उपलब्ध असून, पुणेगावचे पाणी येत्या तीन-चार दिवसात दरसवाडी धरणात पोहचण्याची शक्यता असून, दरसवाडी धरणात पाणी पोहचल्यानंतर दरसवाडी धरणातून पुढे डोंगरगाव पोहोच कालव्याची बाळापूरपर्यंत चाचणी घेतली जाणार आहे. कडवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संघाणी, उपभियांता टाटीया हे स्वत: या व्यवस्थेची पाहणी करीत आहे. दरम्यान, आज येवला तालुका राष्ट्रवादी करॅँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी कार्यकर्त्यांसह पुणेगाव ते दरसवाडीपर्यंत कालव्याची पाहणी केली आहे.
पुणेगाव धरणातून दरसवाडी धरणात सोडलेले पाणी येत्या तीन चार दिवसात धरणात पोहचल्या नंतर दरसवाडी धरणपूर्ण भरण्यास सुमारे चार ते पाच दिवस लागू शकतात . धरण भरल्यानंतरच डोंगरगाव पोहोच कालव्याची येवला तालुक्यातील बाळापुर पर्यंत कालव्याची चाचणी होऊ शकते असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Pune water reached 44 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.