देवळा महाविद्यालयात एनसीसीतर्फे पुनीत सागर अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 12:11 AM2022-05-10T00:11:41+5:302022-05-10T00:12:08+5:30

देवळा : कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने शहरातील कोलती नदीच्या परिसरात ह्यपुनीत सागर अभियानह्ण राबविण्यात आले. या अभियानांतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी नदीच्या पात्रातील व आजूबाजूच्या परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.

Puneet Sagar Abhiyan by NCC at Deola College | देवळा महाविद्यालयात एनसीसीतर्फे पुनीत सागर अभियान

कोलती नदीपात्रात पुनीत सागर अभियान राबविताना देवळा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, समवेत प्राचार्य हितेंद्र आहेर.

googlenewsNext
ठळक मुद्दे विद्यार्थ्यांनी नदीच्या पात्रातील व आजूबाजूच्या परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.

देवळा : कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने शहरातील कोलती नदीच्या परिसरात ह्यपुनीत सागर अभियानह्ण राबविण्यात आले. या अभियानांतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी नदीच्या पात्रातील व आजूबाजूच्या परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.

लेफ्टनंट बादल लाड यांनी पुनीत सागर अभियानविषयी माहिती दिली. भारत सरकार व एनसीसी निदेशालय यांच्या संयुक्त विद्यमाने ह्यपुनीत सागर अभियानह्ण राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये समुद्र, नदी, तलाव, धरणे, जलस्रोत या ठिकाणी स्वच्छता मोहीम व प्लास्टिक गोळा करणे अशा प्रकारचा राष्ट्रव्यापी प्रमुख अभियान राबविण्यात येत आहे.
७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अलोक कुमार सिंग व प्रशासकीय अधिकारी कर्नल राकेश कौल यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम संपूर्ण नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील जलसाठे व नदी, धरणे, तलाव व जलसाठे परिसर प्लास्टिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या सहभागी झालेल्या छात्रांनी देवळा शहरांमध्ये प्रभातफेरी काढून प्लास्टिकचा वापर टाळा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा झाडे जगवा यासारख्या घोषणा देत आपल्या जलसाठाचे संवर्धन याविषयी जनजागृती करण्यात आली.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना यावेळी प्राध्यापिका डॉ. मालती आहेर यांनी प्लास्टिक वापरामुळे होणारी पर्यावरणाची हानी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकमुळे होणारी हानी, निर्माण होणाऱ्या समस्या व प्रदूषण याविषयी माहिती दिली. उपप्राचार्य विजय कुमार जोशी यांनी जलसंवर्धनाची गरज याविषयी मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाला अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक डॉ. मालती आहेर व उपप्राचार्य विजयकुमार जोशी उपस्थित होते. राष्ट्रीय छात्र सेनेच्या अधिकारी लेफ्टनंट बादल लाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Web Title: Puneet Sagar Abhiyan by NCC at Deola College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.