रिक्षा नव्हे कोरोना संसर्गाची शिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:14 AM2021-05-13T04:14:10+5:302021-05-13T04:14:10+5:30

शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च ते एप्रिल या कालावधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे ५ एप्रिलपासून ...

Punishment of corona infection not rickshaw! | रिक्षा नव्हे कोरोना संसर्गाची शिक्षा!

रिक्षा नव्हे कोरोना संसर्गाची शिक्षा!

Next

शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च ते एप्रिल या कालावधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे ५ एप्रिलपासून राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्यावेळी शासनाने जी अधिसूचना जारी केली त्यात नागरिकांना आवश्यक त्या कारणांसाठी प्रवास करायचा असेल तर त्यासाठी दोन प्रवाशांनाच परवानगी देण्यात आली आहे, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र एकदा परवानगी मिळाली की कोणत्याही नियमांचे पालन करायचे नाही असा बहुतांश रिक्षाचालकांचा अनुभव यंदाही आला आहे.

रिक्षा चालवणे हा रोजीरोटीचा व्यवसाय आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचे हातावरचे पोट भरण्यासाठी त्यांनी व्यवसाय करण्यास हरकत नाही. मात्र, आरोग्य नियमांचे पालन न करता होत असलेले उल्लंघन हे संसर्गास कारणीभूत ठरत आहे. नाशिकमध्ये अजूनही कोरोना आटोक्यात आलेला नाही. बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड सोडाच, साधा बेड मिळत नाही अशी अवस्था आहे, अशावेळी वाढत्या संसर्गाची जबाबदारी कोणाची, हा मोठा हा प्रश्न आहे.

इन्फो...

१०,०००

परवानाधारक रिक्षाचालक

---

२,११,८७९

शहरातील एकूण बाधित

----

१४,२०९

सध्या उपचाराधीन रुग्ण

----

१६७४

शहरातील एकूण मृत्यू

---

इन्फो...

वाहतूक पोलीस गायब...

नाशिक शहरात सध्या बहुतांश सिग्नल बंद आहेत. पॉइंटवरही पोलीस नाहीत. वाहतूक पोलीस तर गायबच आहेत. त्यामुळे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन होत असेल त्याला कोणी वाली आहे किंवा नाही, असा प्रश्न केला जात आहे.

-------------

समवेत दोन छायाचित्र

०२पीएचएमए ७७, ७८

Web Title: Punishment of corona infection not rickshaw!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.