लासलगावच्या १७ नागरिकांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:17 AM2021-02-25T04:17:52+5:302021-02-25T04:17:52+5:30
लग्न समारंभ, अंत्यविधी तसेच सर्व सार्वजनिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काही निर्बंध व बंदी असून या नियमांचे ...
लग्न समारंभ, अंत्यविधी तसेच सर्व सार्वजनिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काही निर्बंध व बंदी असून या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा वाघ यांनी दिला.
लासलगाव येथील पोलीस स्टेशन कार्यालयात बोलविलेल्या हाॅल मालक व मंगल कार्यालय चालक यांच्या बैठकीत ते बोलत होते. दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजी पासून संपूर्ण नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने लग्न समारंभासाठी १०० लोकांची उपस्थिती व अंत्यविधीसाठी २० लोकांची उपस्थितीचे बंधन ठेवण्यात आले आहे. तसेच सर्व सार्वजनिक राजकीय, धार्मिक, कार्यक्रमावर बंदी लादण्यात आलेली आहे.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर व दोन व्यक्तींमधील सामाजिक अंतराचे पालन करणे कायद्याने बंधनकारक आहे.
जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करतील अशा नागरिकांवर विशेष पथकाचे मार्फत दंडात्मक व प्रचलित कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे सांगून तसेच सर्व संबंधितांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात येणार आहे. दोन दिवसांमध्ये १७ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ कोठाळे व तीन अंमलदार यांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून विशेष कारवाई करण्यात येत आहे. (२४ लासलगाव)
===Photopath===
240221\24nsk_31_24022021_13.jpg
===Caption===
शासकीय आदेशाचे उल्लंघन झाल्यास गुन्हा !