विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 02:39 PM2020-07-29T14:39:32+5:302020-07-29T14:40:16+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कोव्हिड समतिीच्यावतीने गावात विना मास्क फिरणार्या 20 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. प्रशासनाने त्यांच्याकडून एक हजार ६५० रु पये दंड वसूल केला.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कोव्हिड समतिीच्यावतीने गावात विना मास्क फिरणार्या 20 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. प्रशासनाने त्यांच्याकडून एक हजार ६५० रु पये दंड वसूल केला.
तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे ५९ वर्षीय पुरु षाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने परिसरातील बाधित रु ग्णाचा भाग सील करण्यात आला आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सनियंत्रण अधिकारी दत्तात्रय साळुंके, सरपंच गोपाल शेळके, पोलीस पाटील मनोहर शेळके, ग्रामविकास अधिकारी एस. डी. आहिरे, आरोग्यसेवक ए. बी. गांगुर्डे, प्रणाली दिघे, तलाठी शीतल जाधव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली.
यापूर्वी पंधरा दिवसांपूर्वी गावात कोरोना बाधित रु ग्ण आढळून आल्याने प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. सोमवारी (दि.२७) बाधित रु ग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने गावातील सर्व आस्थापना सुरु करण्यात आल्या आहेत. नांदूरशिंगोटे येथे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क न लावणे, डबलसीट यामुळे नियमांचे पालन होत नव्हते. त्या अनुषंगाने कोरोना समितीने बुधवारी (दि.२९) गावात फिरु न कारवाई केली.
विना मास्क फिरणाºया तसेच दुचाकीवर दोन सिट अशा २० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत १६५० रु पये दंड वसूल केला. यावेळी गावातील व्यापारी दुकानदारांना सोशल डिस्टन, सॅनिटायझर, मास्क बंधनकारक असल्याबाबत समितीने सूचना दिल्या.