साकुरफाटा येथे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:13 AM2021-03-19T04:13:53+5:302021-03-19T04:13:53+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच इगतपुरी तहसील कार्यालयात तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांच्या ...

Punitive action against unmasked pedestrians at Sakurphata | साकुरफाटा येथे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

साकुरफाटा येथे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Next

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच इगतपुरी तहसील कार्यालयात तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीस एक हजार रुपयांचा दंड व फौजदारी गुन्हा दाखल तसेच दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू ठेवणे, कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला परिसर सील करण्याचे आदेश तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिले.

या वेळी पिंपळगाव डुकरा येथे गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी नागरिकांना सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडणे व वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावेत तसेच सर्दी, खोकला, ताप असल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल व्हावे आदीं सूचना केल्या. याप्रसंगी सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे, सरपंच भगवान वाकचौरे, ग्रामसेवक नितेश हेंबाडे, ग्रामसेवक पोपट बोडके, आशा सेविका विजया जाधव, अंगणवाडी पर्यवेक्षिका परशिरे, पोलीस कर्मचारी सोनवणे, वाजे, परदेशी, धरांकर, ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबकराव डुकरे, हिरामण चिकने, परशराम वाकचौरे, भाऊसाहेब कडभाने, ग्रामपंचायत कर्मचारी मारुती भगत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

छायाचित्र- १८नांदूर१

साकुरफाटा येथील विनामास्क फिरणारे नागरिक व दुकानदारांवर दंडात्मक मोहीम राबविताना गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड. समवेत सरपंच भगवान वाकचौरे, ग्रामसेवक नितेश हेंबाडे, सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे.

===Photopath===

180321\18nsk_15_18032021_13.jpg

===Caption===

साकुरफाटा येथील विनामास्क फिरणारे नागरिक व दुकानदारांवर दंडात्मक मोहीम राबवितांना गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड. समवेत सरपंच भगवान वाकचौरे, ग्रामसेवक नितेश हेंबाडे, सहायक गट विकास अधिकारी भरत वेंदे,

Web Title: Punitive action against unmasked pedestrians at Sakurphata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.