कचरा टाकणाऱ्या उद्योजकांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:11 AM2020-09-15T00:11:51+5:302020-09-15T01:31:28+5:30
सिडको : अनियमित घंटागाडी यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील मोकळे भूखंड यासह मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यालगत ठिक ठिकाणी कचºयाचे ठीक साचले आहे .महापालिकेच्या गलधान कारभारामुळे उद्योजक त्रस्त झाले असून सोई सुविधा न देता दंड वसूल करण्यात येत असल्याने याबाबत उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत आयुक्तांची भेट घेणार असल्याचे समजते.
सिडको : अनियमित घंटागाडी यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील मोकळे भूखंड यासह मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यालगत ठिक ठिकाणी कचºयाचे ठीक साचले आहे .महापालिकेच्या गलधान कारभारामुळे उद्योजक त्रस्त झाले असून सोई सुविधा न देता दंड वसूल करण्यात येत असल्याने याबाबत उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत आयुक्तांची भेट घेणार असल्याचे समजते.
महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अंबड औद्योगिक वसाहतीला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे .एकीकडे महापालिकेकडून अंबड औद्योगिक वसाहतीत कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था केली जात नसून दुसरीकडे मात्र या विभागात काम करणारे मनपा अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करीत असून रस्त्यावर कचरा टाकणाºया उद्योजकांवर अरेरावीची भाषा करीत दंड वसूल करीत असल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका अधिकारी यांनी सोमवारी रस्त्यावर कचरा टाकत असल्याप्रकरणी उद्योजकांकडून सुमारे दहा हजार रुपये दंड वसूल केला आहे. मुळात घंटागाडी नियमित येत नसल्याने कचरा कुठे टाकावा व त्याची विल्हेवाट कशी करावी असा प्रश्न उद्योजकांना भेडसावत असताना आता मनपाच्या अधिकाºयांच्या दादागिरीमुळे उद्योजकांना आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे .दंड आकारणी करताना मनपा अधिकारउद्योजकांना दंड न भरल्यास पाचपट दंड भरावा लागेल अशी धमकी देत असल्याने उद्योजकांनी मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे
महापालिका अधिकारी दिलीप चव्हाण व परमार यांनी सोमवारी अंबड इंडस्ट्रियल सोसायटीला कचरा रस्त्यात टाकल्या प्रकरणी सुमारे 10 हजार रुपये दंड केला. वास्तविक पाहता मनपाने प्रथम नियमित घंटागाडी करणे गरजेचे आहे ,असे असतानाही अरेरावीची भाषा करीत अधिकाºयांनी दंड भरण्यास सांगितले . तसेच दंड न भरल्यास पाचपट दंड करू असा दम भरला व दहा हजार रुपये दंड वसूल केला हे अन्यायकारक असून याबाबत मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार
-वरून तलवार, अध्यक्ष ,आयमा
अंबड औद्योगिक वसाहतीत अनियमित घंटागाडी मुळे मोकळ्या भूखंडासह अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग साचले असून ही वस्तुस्थिती आहे. यास मनपा जबाबदार आहे असे असतानाही अधिकारी मात्र अरेरावीची भाषा करीत सक्तीने दंड वसूल करीत आहे. हे अन्यायकारक असून याबाबत आवाज उठवणार.
-दिलीप वाघ, आयमा पदाधिकारी