चार हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:14 AM2021-04-08T04:14:59+5:302021-04-08T04:14:59+5:30
नांदूरशिंगोटे : 43 हजार 500 रुपयांचा दंड वसूल लोकमत न्यूज नेटवर्क नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नाशिक - पुणे महामार्गावरील ...
नांदूरशिंगोटे : 43 हजार 500 रुपयांचा दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नाशिक - पुणे महामार्गावरील हॉटेल्समध्ये ग्राहकांना बसण्यास परवानगी नसताना ग्राहक आढळल्याने महसूलच्या भरारी पथकाने चार हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी दहा हजार रुपयेप्रमाणे ४० हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर सात ग्राहक विनामास्क आढळल्याने प्रत्येकी ५०० रुपयेप्रमाणे तीन हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत एकूण ४३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली. शहर व तालुक्यात ‘ब्रेक द चेन’चे निर्बंध लागू केल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी (दि. ६) महसूल विभागाच्या गस्ती विभागाने अचानक धाडी टाकल्याने हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. शासनाने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केल्याने अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार राहुल कोताडे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार दत्ता जाधव, नितीन गर्जे, नांदूरशिंगोटेचे मंडल अधिकारी भालचंद्र शिरसाट, तलाठी अरुण फसाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास काळे, पोलीस हवालदार प्रवीण अढांगळे, अव्वल कारकून दत्ता सोनवणे, भगवान काकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
--------------------------
प्रत्येकी दहा हजार रूपये दंड
नाशिक - पुणे महामार्गावरील धोंडवीर नगर येथील श्रीराम हॉटेल, गोंंदेे शिवारातील अंबिका बिकानेर राजस्थानी स्वीट्स, नांदूरशिंगोटे येथील हॉटेल साई अमृत व हॉटेल वनपीस या चार हॉटेलमध्ये रात्री आठनंतर ग्राहक आढळले. हॉटेलमध्ये ग्राहकांना बसण्याची परवानगी नसल्याने या हाॅटेल्सवर प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. याचठिकाणी विनामास्क असलेल्या सातजणांवर दंडात्मक कारवाई करत तीन हजार पाचशे रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.