मनपाकडून दंडात्मक कारवाईचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:14 AM2021-05-07T04:14:43+5:302021-05-07T04:14:43+5:30

पंचवटी : शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर तसेच प्लास्टिक पिशव्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही प्लास्टिकचा वापर करणे, कचरा वर्गीकरण ...

Punitive action from NCP | मनपाकडून दंडात्मक कारवाईचा धडाका

मनपाकडून दंडात्मक कारवाईचा धडाका

googlenewsNext

पंचवटी : शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर तसेच प्लास्टिक पिशव्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही प्लास्टिकचा वापर करणे, कचरा वर्गीकरण करणे गरजेचे असताना कचरा वर्गीकरण न करणे, उघड्यावर कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणे, सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क न लावणे, नदीपात्र दूषित करणे, उघड्यावर लघुशंका करणे व जैविक कचरा उघड्यावर टाकणे अशा सुमारे १४४६ बेशिस्त नागरिकांवर मनपा पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करून ८ लाख ३८ हजार ९३५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या आर्थिक वर्षभराच्या काळात पालिका प्रशासनाकडून कारवाई केली आहे. गेल्या वर्षीपासून राज्यभर कोरोना संसर्ग वाढत चालल्याने केसेस संख्या कमी झाली तर वर्षभरात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या सर्वाधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. प्लास्टिक वापर टाळण्यासाठी कारवाई प्रभावीपणे राबविली जात असल्याने प्लास्टिक वापर कमी झाल्याचे दिसून येते.

प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या १६ लोकांवर कारवाई करून ८० हजार रुपये दंड वसूल करत त्यांच्याकडून सुमारे ५० हून अधिक किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहे. कचरा वर्गीकरण न करणाऱ्या ७५ नागरिक व ९ व्यावसायिक अशा ८४ जणांवर कारवाई करीत ७१ हजार रुपये दंड करण्यात आला. प्लास्टिक पालापाचोळा जाळणाऱ्या ८ नागरिकांवर दंडाची कारवाई करून या कारवाईत ६० हजार रुपये दंड वसूल केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या २६७ नागरिकांवर कारवाई करून सुमारे पावणे दोन लाख रुपये दंड ठोठावला. नदीपात्रात अस्वच्छता करून नियमांची पायमल्ली करणाऱ्या १७ नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणू संसर्ग वाढल्याने सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क लावणे बंधनकारक केले आहे. तरी मास्कचा वापर न करणाऱ्या ९७२ नागरिकांवर कारवाई करीत अडीच लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरदेखील दुकान सुरू ठेवून व्यवसाय करणाऱ्या ४ दुकानदारांवर कारवाई करीत २० हजार रुपये तर कोरोना नियम पायदळी तुडवून फिजिकल डिस्टंन्सिंग पालन न केल्याने ६ जणांवर कारवाई करण्यात येऊन २२ हजार रुपये दंड केला आहे.

पंचवटी मनपा घनकचरा विभागाने केलेल्या कारवाईत मनपा लखपती झाली आहे. गेल्या वर्षात मार्चमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन केले होते. त्यामुळे यंदा कारवाई घटली आहे. पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख संजय दराडे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Web Title: Punitive action from NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.