देवळ्यात दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:11 PM2020-05-12T21:11:09+5:302020-05-12T23:22:58+5:30

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार सूचना देऊनही नागरिक नियमांचे पालन नसल्यामुळे वाजगाव ग्रामपंचायतीने आता कडक पाऊल उचलले असून, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला.

Punitive action in the temple | देवळ्यात दंडात्मक कारवाई

देवळ्यात दंडात्मक कारवाई

Next

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार सूचना देऊनही नागरिक नियमांचे पालन नसल्यामुळे वाजगाव ग्रामपंचायतीने आता कडक पाऊल उचलले असून, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला.
तालुक्यालगत असलेल्या मालेगाव तालुक्यात कोरोना संक्रमित रु ग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील अनेक गावात युवकांनी पुढाकार घेऊन गावात प्रवेश करण्याचे मार्गावर अडथळे निर्माण करून नाकेबंदी केली आहे. बाहेरगावाहून येणाºया वाहनांना तसेच नागरिकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांच्या मदतीने वाजगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन कोरोनाचा संसर्ग होण्यास कारण ठरणाºया गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करत कोरोनाशी युद्ध करण्यास ग्रामपंचायत प्रशासन सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. यानंतर बाहेरगावाहून तसेच कंटेन्मेंट झोनमधून गावात राहण्यासाठी येणारे नागरिक, अनोळखी नागरिकांचा गावात होणारा संचार, तसेच गावातीत अत्यावश्यक सेवा देणाºया दुकानात वाढू लागलेली गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे होणारे उल्लंघन, मास्क न वापरणे आदींमुळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नागरिक ग्रामपंचायत प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले.
गावातील प्रवेश मार्गावर बाहेरगावाहून येणाºया नागरिकांची चौकशी करण्यात येणार आहे. दि. १४ ते १७ मे या कालावधित गावातील सर्व किराणा, भाजीपाला, पिठाची चक्की, मास विक्र ी आदी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यावसायिकांना सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याची वेळ ठरवून देण्यात आली. यावेळी ग्रामसेवक जे. व्ही. देवरे, आरोग्य विभागाचे प्रशांत सोनवणे, अमोल देवरे, गिरीश आहेर, यशवंत देवरे, रामचंद्र गवळी, विनोद देवरे, साहेबराव देवरे, सुनील देवरे, वैजनाथ देवरे, संदीप देवरे, आबा देवरे, शैलेंद्र देवरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------
बैठकीत निर्णय
तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असताना अनेक ग्रामस्थ वारंवार सूचना देऊनही मास्कचा वापर करत नसल्यामुळे अशा व्यक्तींना १०० रुपये दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात येऊन मास्कचा वापर न करणाºया २५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.ग्रामपंचायतीने याची गंभार दखल घेत मंगळवारी सरपंच प्रकाश मोहन, उपसरपंच दीपक देवरे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात आले. कंटेन्मेंट झोनमधून आल्याची माहिती न नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Punitive action in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक