पांगरी ग्रामपंचायतीमार्फत धडक दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:45 PM2020-07-28T22:45:45+5:302020-07-29T00:46:27+5:30

पांगरी : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने तोंडाला मास्क, रुमाल न बांधता गावात फिरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईला सुरुवात केली असून, ग्रामस्थांकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे.

Punitive action through Pangri Gram Panchayat | पांगरी ग्रामपंचायतीमार्फत धडक दंडात्मक कारवाई

पांगरी ग्रामपंचायतीमार्फत धडक दंडात्मक कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारचा भाजीबाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्राम प्रशासन घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
पांगरी : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने तोंडाला मास्क, रुमाल न बांधता गावात फिरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईला सुरुवात केली असून, ग्रामस्थांकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे.
कोरोना संसर्गामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच गावातील अनेक दुकाने, हॉटेल्स व इतर आस्थापनांचे मालक खबरदारी न घेता बिनदिक्कतपणे व्यवहार सुरू ठेवत आहे. परिणामी कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता समितीची बैठक होऊन गावात तोंडाला मास्क, रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेऊन कारवाईला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.
किराणा दुकाने, कापड दुकाने, हॉटेल्स, टपरी, शेतीविषयक दुकाने, बार व देशी दारूची दुकाने, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक दुकाने, भाजीपाला विक्री यांसह सर्व आस्थापना संध्याकाळी ७ वाजेनंतर बंद. यानंतर दुकाने उघडी दिसली तर पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच दुचाकी एक सीटाची तर चारचाकीमध्ये तीन व्यक्ती, सँनिटायझर वापरणे, संभाषण वेळी मास्क तोंडावर असणे आवश्यक आहे. अन्यथा दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती नोडल अधिकारी ज्ञानेश्वर कोते यांनी दिली.
ग्रामविकास अधिकारी डी. बी. राणेर, सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, पांगरी खुर्दचे ग्रामसेवक एम. एम. मोरे, पांगरी खुर्दच्या सरपंच मीना शिंदे, तलाठी एस. एम. गुळवे, इंडियन ओव्हरसिसे बँकेचे अधिकारी धनविजय चारटळ, सुभाष पगार, प्रकाश पांगारकर, दत्तू शिंदे, संदीप पगार, सागर हसे, शिवाजी कांडेकर, महेश निकम, राहुल वाघ, कृष्णा शिंदे, संतोष पगार आदींचा पथकात समावेश आहे.प्रत्येकाने विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, ग्रामपंचायत क्षेत्रात तोंडाला मास्क, रुमाल न बांधता फिरणाºयांवर दंडात्मक अथवा पोलीस कारवाई केली जाईल. तसेच शनिवारचा भाजीबाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्राम प्रशासन घेतला आहे.
- डी. बी. राणेर, ग्रामविकास अधिकारी, पांगरी

Web Title: Punitive action through Pangri Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.