पुरणगावच्या शेतकऱ्याचे द्राक्षविक्री पुराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:14 PM2020-04-09T22:14:33+5:302020-04-09T23:15:51+5:30
कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक संकटातून वाचविलेल्या द्राक्षबागा लॉकडाउन व संचारबंदीमुळे शेतातच पडून आहे. पण पुरणगाव येथील शेतकरी उत्तम रायभान ठोंबरे यांनी सोशल मीडियाचा आधार घेत सुमारे दीडशे क्विंटल द्राक्ष विक्र ी केले आहेत. पुरणगावच्या या शेतकºयाच्या द्राक्ष विक्रीचे हे पुराण आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
जळगाव नेऊर : कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक संकटातून वाचविलेल्या द्राक्षबागा लॉकडाउन व संचारबंदीमुळे शेतातच पडून आहे. पण पुरणगाव येथील शेतकरी उत्तम रायभान ठोंबरे यांनी सोशल मीडियाचा आधार घेत सुमारे दीडशे क्विंटल द्राक्ष विक्र ी केले आहेत. पुरणगावच्या या शेतकºयाच्या द्राक्ष विक्रीचे हे पुराण आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
ठोंबरे यांनी परिसरातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर पंधरा रु पये किलो ताजी द्राक्षे किंवा शंभर रु पयाचे सात किलो याप्रमाणे संदेश टाकून मोबाइलवर संपर्कसाधण्याचे आवाहन केले. ग्राहकांनी ठोंबरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आतापर्यंत दीडशे क्विंटल द्राक्षांची खरेदी केली. विशेष म्हणजे सामाजिक सुरक्षा अंतर व तोंडाला मास्क लावून ग्राहकांनी शासन नियमांचे पालन केले.
कोरोनाने जगबंदी, देशबंदी, राज्यबंदी पाठोपाठ जिल्हाबंदी आणि आता गावबंदी झाल्याने सर्वच शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतमाल शेतात ठेवता येत नाही अन् विकायला बाजारपेठ नाही, अशा कोंडीत शेतकरी सापडला आहे. द्राक्ष माल जास्त दिवस झाडांवर राहिल्यास पुढील वर्षी फळ येण्याची शक्यता कमी असते, तसेच पावसाळ्यापूर्वी काडी तयार होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी जाईल त्या भावात द्राक्षांची विक्र ी सुरू केली आहे. शंभर रुपयांचे पुढे भाव मिळणारे द्राक्ष आज पंधरा-वीस रूपये किलोने विकावे लागत आहे. या दराने खर्चही निघणार नाही अशी स्थिती आहे.
पावसाळ्यात प्रचंड मेहनत करून व वारेमाप खर्च करून द्राक्ष बाग वाचवली, परंतु कोरोनाने सर्व कष्टावर पाणी फेरले. विकलेल्या द्राक्षातून उत्पादन खर्च सुद्धा वसूल झाला नाही.
- उत्तम ठोंबरे, पुरणगाव, ता. येवला