प्लॅस्टिक मायक्रॉन मापनासाठी ५० यंत्रांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:45 AM2017-12-27T00:45:23+5:302017-12-27T00:45:50+5:30

पावसाळ्यात प्लॅस्टिकमुळे चेंबर्स तुंबून शहर जलमय होण्याच्या प्रकारामुळे महापालिकेने प्लॅस्टिक विरोधी मोहीम व्यापक करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक मापनासाठी ५० यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. विभागनिहाय मोहीम राबवून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकची विक्री करणाºयांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

The purchase of 50 machines for a plastic micron measuring | प्लॅस्टिक मायक्रॉन मापनासाठी ५० यंत्रांची खरेदी

प्लॅस्टिक मायक्रॉन मापनासाठी ५० यंत्रांची खरेदी

Next

नाशिक : पावसाळ्यात प्लॅस्टिकमुळे चेंबर्स तुंबून शहर जलमय होण्याच्या प्रकारामुळे महापालिकेने प्लॅस्टिक विरोधी मोहीम व्यापक करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक मापनासाठी ५० यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. विभागनिहाय मोहीम राबवून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकची विक्री करणाºयांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच गुन्हे दाखल केले जाणार आहेत.  प्लॅस्टिक पर्यावरणाला घातक ठरू लागल्याने राज्य सरकारनेही त्याविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्रीस बंदी असतानाही सर्रासपणे त्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. यंदा पावसाळ्यात शहरातील रस्ते जलमय होण्याचे खापर महापालिकेच्या बांधकाम विभागाने प्लॅस्टिकवरच फोडले होते. भुयारी गटारींवरील ढापे, चेंबर्स यामध्ये प्लॅस्टिक अडकून रस्त्यांवर पाणी साचल्याचे प्रकार नाशिककरांनी या पावसाळ्यात वारंवार अनुभवले. त्यावेळी आरोग्य विभागाने दोन दिवसांत तब्बल ४६ टन प्लॅस्टिक आढळून आल्याचा दावा केला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील सहाही विभागांत स्वच्छता निरीक्षकांमार्फत प्लॅस्टिकविरोधी कारवाई करण्यात येते. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक मापनासाठी महापालिकेकडे यापूर्वी ५ ते ६ यंत्रे होती. त्यामुळे बºयाचदा मापनात अडचणी येऊन सरसकट कारवाई केली जात होती. परंतु, आता राज्य शासनच प्लॅस्टिकबंदीबाबत कठोर बनले असताना महापालिकाही सतर्क झाली असून, मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी महापालिकेने पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक मापनासाठी ५० यंत्रे खरेदी केली आहेत. प्रत्येक विभागाला ८ यंत्रे दिली जाणार असून, त्यामुळे कारवाईला गती प्राप्त होणार असल्याचा दावा आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी केला आहे. 
दीड लाखांचा दंड वसूल 
महापालिकेने एप्रिल २०१७ पासून आतापर्यंत सहाही विभागात प्लॅस्टिकविरोधी मोहीम राबवित ५६० किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे. या मोहिमेतून १ लाख ६९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकची विक्री करताना आढळून आल्यास पहिल्यांदा पान हजार रुपये दंड वसूल केला जातो. पुन्हा विक्री करताना आढळल्यास दहा हजार रुपये दंड केला जातो. मात्र, त्यानंतरही विक्री करताना आढळून आल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

Web Title: The purchase of 50 machines for a plastic micron measuring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.