नामपूरला दीड लाखात बैलजोडीची खरेदी गावातून मिरवणूक : आधुनिक काळात महत्त्व कायम; शेतकऱ्याचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 05:52 PM2018-10-03T17:52:52+5:302018-10-03T17:53:09+5:30

नामपूर : आधुनिक काळात बळीराजा यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती करण्याचा प्रयत्नात दिसून येत असताना दुसरीकडे मात्र नामपूर कृषी उत्पन बाजार समितीतून चंदनपूर येथील विठोबा रामलाल देवरे या शेतकºयाने चक्क दीड लाख रुपयांत बैलजोडी घेऊन बाजार समितीचे आजपर्यंतचे रेकॉर्ड तोडल्यामुळे त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

Purchase of bullocks in Nandpur for one and a half lakhs in the village: Promoting importance in modern times; Welcome to the Farmer | नामपूरला दीड लाखात बैलजोडीची खरेदी गावातून मिरवणूक : आधुनिक काळात महत्त्व कायम; शेतकऱ्याचे स्वागत

नामपूरला दीड लाखात बैलजोडीची खरेदी गावातून मिरवणूक : आधुनिक काळात महत्त्व कायम; शेतकऱ्याचे स्वागत

googlenewsNext

नामपूर : आधुनिक काळात बळीराजा यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती करण्याचा प्रयत्नात दिसून येत असताना दुसरीकडे मात्र नामपूर कृषी उत्पन बाजार समितीतून चंदनपूर येथील विठोबा रामलाल देवरे या शेतकºयाने चक्क दीड लाख रुपयांत बैलजोडी घेऊन बाजार समितीचे आजपर्यंतचे रेकॉर्ड तोडल्यामुळे त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती कसण्यासाठी प्राचीन काळापासून बैलांचा वापर केला जातो. ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय ही संत तुकारामांची उपमा सर्व जगाला माहिती आहे. शेतकरी आपल्या शेतीची मशागत करण्यासाठी बैलाचा उपयोग करत असतो. बैल व शेतकरी यांचे अतूट नाते आहे. दरवर्षी बैलपोळा उत्साहात साजरा केला जातो; मात्र काळाच्या ओघात शेती व्यवसायात अनेक संकटे निर्माण झाली असून, जास्त लोकसंख्येमुळे जमिनीचे तुकडे झाले आहेत. याचाच परिणाम म्हणून चारा -पाण्याअभावी पशुपालन करणे अवघड झाले आहे. यामुळे बैलजोडीऐवजी यांत्रिकीकरणाकडे जनतेचा कल वाढला आहे. नामपूर बाजार समितीत अनेक बैलजोड्या विकल्या जातात मात्र दीड लाखात बैल जोडी विक्र ी झाल्यामुळे परिसरात सर्वत्र चर्चा होत आह . 

Web Title: Purchase of bullocks in Nandpur for one and a half lakhs in the village: Promoting importance in modern times; Welcome to the Farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार