जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनतर्फे आठ हजार क्विंटल मका खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 09:03 PM2020-06-13T21:03:57+5:302020-06-14T01:34:24+5:30
नाशिक : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यातील विविध केंद्रांवर २७६ शेतकऱ्यांकडून एकूण आठ हजार ४०४ क्विंटल मका पिकाची खरेदी करण्यात आली असून, त्यात येवला तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. निफाड आणि नांदगाव तालुक्यातील शेतकºयांनी मात्र या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

दि महाराष्टÑ स्टेट को. आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात दि. २२ मेपासून रब्बी हंगामातील मका खरेदी करण्यास प्रारंभ झाला असून, यासाठी तालुकानिहाय खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या खरेदी केंद्रांवर मका पिकाला १७६० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे दर दिला जात असून, आॅनलाइन पद्धतीने थेट शेतकºयांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येत आहेत. या खरेदी केंद्रांवर मका विक्रीसाठी शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्यानंतरच संबंधित शेतकºयाची मका खरेदी केली जाते. केवळ रब्बी हंगामातीलच मका पिकाची खरेदी केली जात असल्याने आवक कमी असल्याचे दिसून येत आहे. यासाठी शेतकºयांच्या सातबारा उताºयावर रब्बी मक्याची नोंद आवश्यक आहे. जिल्ह्यात सिन्नर, येवला, चांदवड, नांदगाव, मालेगाव, सटाणा, देवळा, निफाड या तालुक्यांमध्ये खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. येवला तालुक्यात ९६ शेतकºयांकडून १९५६.५० तर चांदवड तालुक्यात ४२ शेतकºयांकडून १५६० क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. निफाड आणि लासलगाव अशा दोन ठिकाणी खरेदी केंद्रे उभारण्यात आली असून, निफाड आणि नांदगाव तालुक्यातील खरेदी केंद्रांकडे शेतकºयांनी पाठ फिरविली आहे.
-------------------------
तालुकानिहाय केंद्रांवर झालेली खरेदी
तालुका शेतकरी क्विंटल
सिन्नर ३७ १३९८.५०
येवला ९६ १९५६
चांदवड ४२ १५६०.००
तालुका शेतकरी क्विंटल
मालेगाव २३ ६७८
सटाणा २९ ८८६.५०
देवळा ३४ १५५५.५०