जिल्ह्याबाहेरून महागडे बियाणे खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 11:17 PM2020-09-05T23:17:03+5:302020-09-06T01:06:07+5:30
देवळा : उन्हाळी कांदा बियाणांच्या टंचाईमुळे चालूवर्षी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेजारील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महागडे बियाणे खरेदी केले आहे. परंतु या बियाणांच्या दर्जाबद्दल कोणतीही हमी नसल्यामुळे फसवणूकची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : उन्हाळी कांदा बियाणांच्या टंचाईमुळे चालूवर्षी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेजारील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महागडे बियाणे खरेदी केले आहे. परंतु या बियाणांच्या दर्जाबद्दल कोणतीही हमी नसल्यामुळे फसवणूकची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी कांदा बियाणे खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांनी केले आहे. तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी डोंगळ्यांची लागवड करून स्वत:च कांदा बियाणे तयार करतात. परंतु गतवर्षी वातावरणाची साथ न मिळाल्यामुळे डोंगळ्यांचे मोठे नुकसान झाले.बियाणासाठी मोठी प्रतीक्षा यादी
१शेतकºयांना उन्हाळी कांदा बियाणासाठी सर्वत्र शोधाशोध करण्याची वेळ आली. परंतु टंचाई असल्यामुळे जिल्ह्याबाहेरून शेतकºयांनी महागडे बियाणे खरेदी केले. परंतु ह्या बियाणाबद्दल कोणतीही हमी नसल्यामुळे त्याच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केल.
२देवळा तालुका शेतकरी संघाने एनएचआरडीएफचे बियाणे शेतकºयांना उपलब्ध करून दिल्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला. परंतु यानंतर अद्यापही शेतकरी संघाकडे बियाणासाठी शेतकºयांची मोठी प्रतीक्षा यादी असून, शेतकरी संघाला मागणी करूनही कांदा बियाणे उपलब्ध झालेले नाही.
३हमखास उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून शेतकरी उन्हाळी कांदा लागवड करतात. कांदा बियाणाचे गगनाला भिडलेल्या दरांमुळे शेतकरी हतबल झाले असून, कांदा लागवड कशी करायची या विवंचनेत आहेत. यामुळे शेतकºयांना आपले उन्हाळी कांदा लागवडीचे उद्दिष्ट सोडून द्यावे लागणार आहे. गतवर्षीदेखील शेतकºयांनी बियाणा टंचाईमुळे कांदा लागवड केली नव्हती.कृषी बियाणे विक्रेत्यांनी, शेतकºयांना कांदा बियाणे विक्री केल्यानंतर पक्की बिल पावती द्यावी, त्यात बियाणे जात, कंपनी, लॉट नंबर, उत्पादन तारीख इत्यादी आवश्यक माहिती बिलावर नमूद करावी. शेतकरी व विक्रेता यांनी बिलावर स्वाक्षरी करावी. शेतकºयांना ना बिल व पॉकेट सांभाळून ठेवण्यास सांगावे.- सचिन देवरे, तालुका कृषी अधिकारी, देवळा
पहिल्या टप्प्यात आठ क्विंटल कांदा बियाणाचे शेतकºयांना यादी प्रमाणे वाटप केले आहे. परंतु अजूनही ३०० शेतकºयांनी २० क्विंटल बियाणाची मागणी आमच्याकडे नोंदवली आहे.
- गोरख आहेर, व्यवस्थापक, शेतकरी संघ, देवळा