शारीरिक अंतर राखत उंबरदहाडला धान्य खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:42 PM2020-04-25T23:42:27+5:302020-04-25T23:42:48+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दक्षता घेण्यात येत असून, पेठ तालुक्यातील उंबरदहाड ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर केला आहे.
पेठ : कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दक्षता घेण्यात येत असून, पेठ तालुक्यातील उंबरदहाड ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर केला आहे.
कोरोनामुळे नागरिकांच्या हाताला काम नसल्याने शासनाकडून पुढील तीन महिन्याचे अल्प दरात रेशन व प्रत्येकी ५ किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात येत असून धान्य दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ नये यासाठी सरपंच जिजाबाई कुंभार व ग्रामसेवक धीरज भामरे यांनी ग्रामपंचायत स्तरावर योग्य नियोजन करून रेशन वाटपाचे वेळापत्रक तयार केले. ग्राहक व दुकानदार यांना ठरावीक वेळ ठरवून दिल्यामुळे कोणत्याही प्रकारची गर्दी न होता प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ घेता येत असल्याचे ग्रामसेवक भामरे यांनी सांगितले.