६६ लाखांच्या निविदा मंजुरीवर नऊ कोटींची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:41 AM2020-12-04T04:41:35+5:302020-12-04T04:41:35+5:30

महापालिकेत कोणत्याही कामासाठी शासकीय नियमानुसार दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी असेल तर निविदा काढणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात ...

Purchase of Rs. 9 crore on tender sanction of Rs. 66 lakhs | ६६ लाखांच्या निविदा मंजुरीवर नऊ कोटींची खरेदी

६६ लाखांच्या निविदा मंजुरीवर नऊ कोटींची खरेदी

Next

महापालिकेत कोणत्याही कामासाठी शासकीय नियमानुसार दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी असेल तर निविदा काढणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे न करता प्रत्यक्षात एकाच खरेदी निविदेवर खरेदी करण्यात आली. यातील २१७ कामे आयुक्तांच्या अधिकारात करण्यात आली असून, त्याची माहिती २४ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आली आहे. मात्र, उद्यान विभागाने केवळ १३ ऑगस्ट २०१९ ते २६ मार्च २०२० पर्यंत माहिती उपलब्ध करून दिली आहे. या कालावधीत २१७ कामांच्या फायली उद्यान विभागाने मागील निविदा मंजूर दराने केल्या. त्यात ८.८४ कोटींची कामे तुकडे पाडून करण्यात आली असून, ही बाब अतिशय गंभीर असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बडगुजर यांनी केली आहे. महापालिकेला इतक्या तातडीच्या कामांची गरज होती काय, असा प्रश्न करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बडगुजर यांनी केली आहे.

Web Title: Purchase of Rs. 9 crore on tender sanction of Rs. 66 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.