अभोणा उपबाजारात शुद्ध पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 09:30 PM2020-08-04T21:30:49+5:302020-08-05T01:11:14+5:30

अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात व्यापारी व शेतकऱ्यांसाठी शुद्ध व थंड पेयजल सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ समिती संचालक ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

Pure drinking water in Abhona sub-market | अभोणा उपबाजारात शुद्ध पिण्याचे पाणी

अभोणा उपबाजारात शुद्ध पिण्याचे पाणी

Next
ठळक मुद्दे सुविधा कार्यान्वित झाल्याने व्यापारी व शेतकºयांनी समाधान व्यक्त केले

अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात व्यापारी व शेतकऱ्यांसाठी शुद्ध व थंड पेयजल सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ समिती संचालक ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
येथील उपबाजारात वर्षभर कांदा, मिरची, भाजीपाला, गहू, सोयाबीन, मका आदि शेतमालाच्या विक्र ीसाठी तालुका परिसरातून शेकडो वाहने येत असतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. आवारात शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सभापती धनंजय पवार यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली होती. सुविधा कार्यान्वित झाल्याने व्यापारी व शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी संचालक डी. एम. गायकवाड, रमेश पवार, रामचंद्र गायकवाड, बाळासाहेब वराडे, उपसचिव रवींद्र पवार, विशाल वाघ, खरेदीदार व्यापारी मनोहर पवार, गणेश निकम, योगेश सिरसाठ, संजय बोरसे, फारूक तांबोळी, विकी पाटील, वसंत निकम, युवराज पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Pure drinking water in Abhona sub-market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.