मामाच्या गावाला जाण्याची इच्छा झाली पुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:09 PM2020-08-22T22:09:47+5:302020-08-23T00:19:44+5:30

नाशिक : खरे तर दरवर्षी सुटीत मामाच्या गावाला जाऊन धम्माल मस्ती करणाऱ्या मुलांसाठी यंदा मामाचे गाव दूरच राहिले. कोरोनामुळे शाळेची संपूर्ण सुट्टी घरीच गेली. जिल्हाबंदीमुळे प्रवासाला परवानगीच नसल्याने जिल्ह्यातील जिल्ह्यातही मुलांना मामाचे गाव गाठता आले नाही. परंतु बसेस सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी मामाच्या गावाला जाण्यासाठी बसमध्ये बसलेल्या मुलांच्या चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता. कंडक्टरने डबल बेल दिली आणि बस सुरू होताचा मुलांनी जल्लोषच केला.

Puri wanted to go to his uncle's village | मामाच्या गावाला जाण्याची इच्छा झाली पुरी

मामाच्या गावाला जाण्याची इच्छा झाली पुरी

Next
ठळक मुद्देबच्चे कंपनी खूश । गाडी स्थानकातून सुटताच मुलांचा जल्लोष

नाशिक : खरे तर दरवर्षी सुटीत मामाच्या गावाला जाऊन धम्माल मस्ती करणाऱ्या मुलांसाठी यंदा मामाचे गाव दूरच राहिले. कोरोनामुळे शाळेची संपूर्ण सुट्टी घरीच गेली. जिल्हाबंदीमुळे प्रवासाला परवानगीच नसल्याने जिल्ह्यातील जिल्ह्यातही मुलांना मामाचे गाव गाठता आले नाही. परंतु बसेस सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी मामाच्या गावाला जाण्यासाठी बसमध्ये बसलेल्या मुलांच्या चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता. कंडक्टरने डबल बेल दिली आणि बस सुरू होताचा मुलांनी जल्लोषच केला.
जिल्हांतर्गत बसेस सुरू झाल्यानंतर शहरातील जुने सीबीएस स्थानकातून तालुका पातळीवरील शटल बसेस सुरू करण्यात आल्या. सटाणा बसमध्ये खिडकीजवळची सीट पकडून बसलेल्या दोघा मुलांचा उत्साह अजिबात लपत नव्हता. कुठे निघाला बच्चे कंपनी, असे त्यांना विचारले असता त्यांनी एका सुरात मामाच्या गावाला चाललो असे सांगितले. इतके दिवस घरातच अडकून पडलेल्या मुलांना मामाच्या गावाला जाण्याचा आनंद होताच बसमध्ये बसल्याचा दुहेरी आनंदही त्यांच्या चेहºयावरून चमकून गेला. गेल्या पाच महिन्यांपासून संपर्काची नाळ तुटल्यामुळे एकमेकांची ओढ लागलेली मने बससेमुळे जुळूुन येतील, असे आश्वासक हावभाव त्या मुलांच्या चेहºयावर तरळत होते.
रक्षाबंधनाला तरी मामाचा गाव गाठता येईल अशी या मुलांची अपेक्षा होती. परंतु जिल्हाबंदीमुळे बहिणींना भावाच्या गावी जाता आले नव्हते, अनेकांनी खासगी वाहनांचा पर्याय शोधला; परंतु त्यांना अन्य सर्व तपासण्यातून जावे लागतले.गावागावाला आणि मनामनाला जोडणाºया एसटीला याचमुळे महाराष्टÑाची जीवनवाहिनीही म्हटले जाते. बसमध्ये बसून मामाच्या गावाला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. गेल्या पाच महिन्यांनी प्रवासी आणि चालक -वाहकांनी देखील माणुसकीचा जिवंतपणा अनुभवला.

Web Title: Puri wanted to go to his uncle's village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.