मतदार याद्यांची शुद्धीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:21 AM2018-03-28T00:21:59+5:302018-03-28T00:21:59+5:30
निवडणुकांच्या काळात मतदार याद्यांमध्ये दिसून येणाऱ्या त्रुटी आणि दोष दूर करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले असून, राज्याचे निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी मंगळवारी (दि. २७) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील निवडणूक अधिकाºयांशी संवाद साधत निवडणूक याद्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक : निवडणुकांच्या काळात मतदार याद्यांमध्ये दिसून येणाऱ्या त्रुटी आणि दोष दूर करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले असून, राज्याचे निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी मंगळवारी (दि. २७) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील निवडणूक अधिकाºयांशी संवाद साधत निवडणूक याद्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. आगामी काळात होणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही तयारी सुरू झाल्यामुळे प्रशासनाकडून मतदारांची नोंदणी वाढविण्यासोबतच मतदार याद्या सुसज्ज करणे, दुबार नोंदणी वगळणे या कामांना लागले आहे. लोकसभा निवडणुका पुढील वर्षभरामध्ये होणार असून, यावेळी होणाºया मतदानाच्या वेळी मतदार यादीमध्ये त्रुटी राहू नयेत, या उद्देशाने निवडणूक आयोग एक वर्ष आधीच कामाला लागले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ४५ लाख मतदारांपैकी १० हजार ४४५ मतदारांकडे कृष्णधवल छायाचित्रांचे ओळखपत्र आहेत. या ओळखपत्रांवर रंगीत छायाचित्र अद्ययावत करण्याचे काम सध्या निवडणूक विभागाकडून सुरू असून, सुमारे २२०० रंगीत छायाचित्रे निवडणूक विभागाकडे जमा झाली आहेत. तर सुमारे १ लाख १२ हजार मतदारांच्या ओळखपत्रांवर छायाचित्रच नाहीत. यापैकी सुमारे २० हजार छायाचित्रे निवडणूक विभागाकडून या छायाचित्रांसह अद्ययावत ओळखपत्रे निवडणूक विभागाला दिली जाणार आहेत. उर्वरित मतदारांशी संवाद साधून त्यांच्या रंगीत छायाचित्रांसह ओळखपत्र अद्ययावत करून मतदार यादी शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असून, एप्रिलअखेर मतदार याद्यांचे १०० टक्के शुद्धीकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर आहे.
मतदार यादीत चुकांची शृंखला
मतदार यादीतील माहितीमध्ये मतदाराचे प्रथम नाव व आडनाव रिकामे असणे, चुकीची अक्षरे असणे, यादी भाग नसणे, घर क्र मांक नसणे, चुकीचे वय, मतदारांच्या नातेसंबंधांमध्ये योग्य शब्द नसणे असे काही दोष आहेत. छायाचित्रांचे अद्ययावत करण्यासोबतच शुद्धीकरण मोहिमेत हे दोषही काढणे आवश्यक असताना काही भागात याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत.
नवीन मतदार नोंदणीकडे दुर्लक्ष
मतदार शुद्धीकरण प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाचे कर्मचारी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत असताना अनेक तरुणांकडून मतदार नावनोंदणीसाठी विचारणा होत असते. परंतु, शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान नवीन मतदार नोंदणीक डे दुर्लक्ष होत असल्याने अनेक नवमतदार त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित आहेत.