पुनवेच्या चंद्रप्रकाशात ‘पौर्णिमा महोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:15 AM2018-12-25T00:15:06+5:302018-12-25T00:15:25+5:30

‘उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा...’ या नाट्यगीतातून प्र. के. अत्रे यांनी पुनवेच्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या सृष्टीसौंदर्याचे चपखल वर्णन केले आहे. पुनवेची रात्र म्हटली की, अवघे रान चंद्रप्रकाशाने उजळून निघालेले असते.

'Purnima Mahotsav' in the moonlight of reeve | पुनवेच्या चंद्रप्रकाशात ‘पौर्णिमा महोत्सव’

पुनवेच्या चंद्रप्रकाशात ‘पौर्णिमा महोत्सव’

googlenewsNext

लोकमत  विशेष

नाशिक : ‘उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा...’ या नाट्यगीतातून प्र. के. अत्रे यांनी पुनवेच्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या सृष्टीसौंदर्याचे चपखल वर्णन केले आहे. पुनवेची रात्र म्हटली की, अवघे रान चंद्रप्रकाशाने उजळून निघालेले असते. अशा वातावरणात पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पर्यटन महामंडळाच्या विविध रिसॉर्टमध्ये ‘पौर्णिमा महोत्सव’ दरमहा रंगणार आहे. पर्यटकांना महामंडळाच्या रिसॉर्टकडे आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.  पौर्णिमेच्या रात्री शांत ठिकाणी आपल्या कुटुंबीयांसमवेत निवांत क्षण घालविण्याची मजा काही औरच असते. पर्यटकांचा हा आनंद अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा आणि देशाटनाची सफर मनोरंजनात्मक ठरावी, या उद्देशाने राज्य पर्यटन विकास महामंडळाने आगळावेगळा ‘पौर्णिमा महोत्सव’ हा उपक्रम राज्यभरात राबविण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (दि.२२) ताडोबा अभयारण्य परिसरातील पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टपासून करण्यात आली. राज्यातील एकूण २२ ते २५ निसर्गरम्य पर्यटन केंद्रांवरील रिसॉर्टमध्ये दरमहा पौर्णिमेच्या रात्री हा आगळावेगळा महोत्सव रंगलेला पहावयास मिळणार आहे.
पौर्णिमेच्या चंद्राची भुरळ अनेक कवी, कादंबरी कथाकार, लेखकांना पडली आहे. महामंडळाच्या या माध्यमाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून लोकांना अधिकाधिक जोडण्यासाठी हा महोत्सव राबविला जात आहे. लेखक, कवी, गायकांच्या कलेद्वारे पर्यटकांना आनंद देणे आणि कवी, साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे. डिसेंबरअखेर सुरू झालेला हा उपक्रम पुढील वर्षात बारमाही राबविला जाणार आहे.
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तसेच भंडारदरा परिसरातील रिसॉर्टमध्ये पौर्णिमा उत्सव रंगणार असल्याची माहिती प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली. जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर येथे पर्यटन महामंडळाचे रिसॉर्ट आहे. तसेच नाशिकपासून जवळच मात्र अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि शिर्डी येथील रिसॉर्टमध्येही पौर्णिमा महोत्सव आयोजित केला जाणार आहे.
स्थानिक कवी, गायकांना संधी  दर आठवड्याला रिसॉर्टमध्ये पर्यटकांची गर्दी असते. त्यांच्या मनोरंजनासाठी स्थानिक कवी, गायक, नकलाकार यांनाही त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये दर आठवड्याला उपलब्ध होणार आहे. यासाठी इच्छुकांनी प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 'Purnima Mahotsav' in the moonlight of reeve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.