खाद्याच्या शोधात काळा करकोच्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 05:24 PM2019-02-18T17:24:43+5:302019-02-18T17:25:43+5:30

देशमाने : रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी आदी पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याने पशु-पक्षावर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काळा करकोचा पक्षाचे परिसरात मोठ्या संख्येने आगमन झाले आहे. पावसाळा संपताच आॅक्टोबर-नोव्हेंबर मिहन्यात या पक्षांचे परिसरात आगमन होते. मात्र खाण्यासाठी अन्न-पाणी मिळत नसल्याने दिवसभर आकाशात भटकंती करताना दिसत आहे.

In the pursuit of food, black wandering rails | खाद्याच्या शोधात काळा करकोच्यांची भटकंती

खाद्याच्या शोधात काळा करकोच्यांची भटकंती

Next
ठळक मुद्दे पक्षांचे थवेच्या-थवे अन्न-पाण्याच्या शोधात आकाशात उडताना दिसत आहे.

देशमाने : रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी आदी पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याने पशु-पक्षावर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काळा करकोचा पक्षाचे परिसरात मोठ्या संख्येने आगमन झाले आहे. पावसाळा संपताच आॅक्टोबर-नोव्हेंबर मिहन्यात या पक्षांचे परिसरात आगमन होते. मात्र खाण्यासाठी अन्न-पाणी मिळत नसल्याने दिवसभर आकाशात भटकंती करताना दिसत आहे.
दिवसागणिक शेतकरी रब्बी हंगामात देखील गहू, हरबरा, ज्वारी आदी पिकाऐवजी फळबाग व नगदी पिकाकडे वळल्याने परिसरातील विविध प्रजातीच्या पक्षांची लक्षणीय घट झालेली दिसून येत आहे. मात्र असे असतानाही काळा करकोचा पक्षांचे थवेच्या-थवे अन्न-पाण्याच्या शोधात आकाशात उडताना दिसत आहे.
एकवेळ देशमानेसह परिसरात रब्बी हंगामात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असे, पाठोपाठ हरभऱ्याचे पीक असत. सदर पीक बहरात येताच अनेक प्रजातीच्या पक्षांना मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध होत असे. रब्बी हंगाम पशु-पक्षांच्या किलबिलाटाने गजबजून जात असे. सायंकाळच्या वेळेस लाखो मैनांचे अवकाशातील विलोभनीय विहार आता लोप पावत चालले आहे.

चौकट....
आजही परिसरात मोर, साळुंकी, चिमणी, मैना आदींसह विविध प्रजातींचे पक्षी आढळून येतात, मात्र मोठ्या प्रमाणात वृक्षाची संख्या घटत चालल्याने त्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.
पूर्वी मानवाच्या गरजा मर्यादित होत्या. गरजेपुरते अन्न-धान्य पिकवले तरी समाधानी होता, मात्र दिवसागणिक अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी व नगदी पिकांकडे शेतकरी वळल्याने स्वत:सह निसर्गाची मोठी हानी करत आहे. पशु-पक्षांच्या संवर्धनासाठी त्यांच्यासाठी चारा-पाण्याची सोय प्रत्येकाने आवर्जुन केली पाहिजे.
- कैलास जगताप, देशमाने.

Web Title: In the pursuit of food, black wandering rails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.