महापालिका अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 10:42 PM2020-05-20T22:42:57+5:302020-05-21T00:01:38+5:30
पंचवटी : महापालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागामार्फत दररोज रस्त्यावर बसणाºया अनधिकृत भाजीविक्रेत्यांना जागा खाली करण्याबाबत सूचना दिला जात आहे. मात्र काही भाजीपाला विक्रेते व हातगाडीधारक अतिक्र मण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी शिवीगाळ व धक्काबुक्की करत कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या कर्मचाºयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी कर्मचाºयांनी केली आहे.

लॉकडाउन सुरू झाल्यापासून पंचवटी परिसरात विशेषत: हिरावाडीरोड, हिरावाडी, पेठरोड, दिंडोरीरोड, आरटीओ परिसर या भागात शेकडो भाजीपाला विक्रे त्यांची दुकाने वाढली आहे. महापालिका प्रशासनाने या विक्रे त्यांना वेळ व जागा ठरवून दिली असली तरी अनेक विक्रेत्यांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. महापालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागामार्फत भाजीविक्रेत्यांना सूचना देऊन नियमांचे पालन करण्याबाबत सांगितले जात असले तरी अनेक विक्रे ते पहाटेपासून दुकाने लावत असल्याने त्याठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे, परिणामी कोणाचा संसर्ग होण्याचा अधिक धोका असल्याने प्रशासनामार्फत कारवाई केली जात आहे. अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईसाठी गेले असता भाजीविक्रे ते पथकातील कर्मचाºयांना दमदाटी शिवीगाळ करत अंगावर धावून धक्काबुक्की करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. गेल्या आठवड्यात हिरावाडीरोड, तर गुरु वारी पेठरोडला पथकातील कर्मचºयांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडल्याचे समजते.
--------------
अतिक्र मण विभागाबरोबर पोलीस पथकही असते मात्र गेल्या काही दिवसांपासून पथकाबरोबर पोलीस पथक नसल्याने अतिक्र मण विभागाच्या कर्मचाºयांना रस्त्यावर बसणाºया भाजीविक्र ेते व हातगाडीधारकांना हटविण्यासाठी विनवणी करावी लागत आहे. विनवणी केल्यानंतरदेखील विक्रे ते हटत नसल्याने पथकातील कर्मचारी विक्रे त्यांचा भाजीपाला जप्त करण्याची कारवाई सुरू करताच नेमका त्याचवेळी विक्रे ते व कर्मचाºयांमध्ये वाद होतात, त्यातून विक्रे ते थेट पथकातील कर्मचाºयांना दमदाटी शिवीगाळ करून धक्काबुक्की करत असल्याने अतिक्र मण विभागाच्या कर्मचाºयांना कारवाई करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.