सोमेश्वर देवस्थानमधील विश्वस्तांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:24 AM2017-09-04T00:24:24+5:302017-09-04T00:25:07+5:30
शहरातील शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या सोमेश्वर देवस्थानच्या विश्वस्त नियुक्तीत वर्षानुवर्षे काम करणाºया तसेच इच्छुक राजकीय व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. धर्मदाय आयुक्तांनी राजकारणरहीत व्यक्तींना प्राधान्य दिले असून, अनेक नव्या चेहºयांना संधी मिळाली आहे.
नाशिक : शहरातील शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या सोमेश्वर देवस्थानच्या विश्वस्त नियुक्तीत वर्षानुवर्षे काम करणाºया तसेच इच्छुक राजकीय व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. धर्मदाय आयुक्तांनी राजकारणरहीत व्यक्तींना प्राधान्य दिले असून, अनेक नव्या चेहºयांना संधी मिळाली आहे.
गंगापूररोडवरील विश्वस्तांची मुदत संपल्याने सहायक धर्मदाय आयुक्त दीप्ती कोळपकर यांनी अर्ज मागवले होते. पाच वर्षांसाठी ही निवड होत असते. यात अकरा विश्वस्तांच्या जागेसाठी ४८ व्यक्तींनी अर्ज दाखल केले होते. त्यासाठी शनिवारी (दि.१) मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश जाहीर करण्यात आले. त्यानुसार निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र लक्ष्मीनारायण भुतडा, अविनाश साहेबराव पाटील, प्रमोद बाळकृष्ण गोरे, बापूसाहेब विठ्ठल गायकर, हरिश्चंद्र रावजी मोगल, राहुल शंकर बर्वे, सतीश रामचंद्र मुजुमदार यांची खुल्या गटातून निवड करण्यात आली. तर गोकुळ नामदेव पाटील, ह.भ.प. भीमराव गंगाधर पाटील यांची गंगापूर, नारायण लांबे, शामिसंग परदेशी यांची गोवर्धन गावातून निवड करण्यात आली आहे. लवकरच देवस्थानच्या अध्यक्ष, खजिनदार आणि सरचिटणीसांची निवड केली जाणार आहे. देवस्थानमध्ये अनेक वर्षे काम करणाºया मुरलीधर पाटील तसेच अन्य अनेक जणांना स्थान मिळालेले नाही. तसेच एका आमदाराच्या कन्येनेदेखील मुलाखत दिली होती. महापालिकेतील एका पदाधिकाºयाने तर पालकमंत्र्यांची चिठ्ठीही आणली होती. परंतु यंदा राजकीय मंडळींना स्थान मिळू शकलेले नाही.