राज्यस्तरीय नेमबाजीत पुष्पाला सुवर्ण

By admin | Published: June 24, 2014 08:41 PM2014-06-24T20:41:41+5:302014-06-25T00:15:35+5:30

राज्यस्तरीय नेमबाजीत पुष्पाला सुवर्ण

Pushpala gold in state level shooting | राज्यस्तरीय नेमबाजीत पुष्पाला सुवर्ण

राज्यस्तरीय नेमबाजीत पुष्पाला सुवर्ण

Next

 


नाशिक : कॅप़ एझिकल राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत नाशिकच्या पुष्पा जाधव हिने १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात सुवर्णपदक पटकावले़
मुंबई येथे नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या़ यामध्ये सहभागी झालेल्या नाशिक येथील प्रिसाईज शुटिंग क्लबची नेमबाज पुष्पा जाधव हिने ४०० पैकी ३६० गुण प्राप्त करत सुवर्णपदकाला गवसणी घातली़ तिची जी़ एस़ मावळकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ तिच्यासह हर्षवर्धन जाधव याचीही राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ क्रीडा प्रशिक्षक अभय कांबळे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले़

Web Title: Pushpala gold in state level shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.