शेतकरी वर्गावर कृत्रिम संकटाचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:56 PM2020-09-21T17:56:30+5:302020-09-21T17:59:03+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटा बरोबरच शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकांची चोरी व शेती साहित्याची चोरी होत असल्याने शेतकरी मेटा कुटीस आले आहे.
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटा बरोबरच शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकांची चोरी व शेती साहित्याची चोरी होत असल्याने शेतकरी मेटा कुटीस आले आहे.
अगोदरच कोरोना महामारी रोगाने शेतकरी परेशान झालेला असताना. तोंडी आलेला घास मुसळधार पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या संकटा बरोबरच जानोरी परिसरात चोरांचा धुमाकूळ वाढला आहे. जानोरी परिसरातील शेरी रस्त्यालगत राहत असणारे शेतकरी विलास वाघ यांचे चोरट्यांनी रात्री टोमॅटो तोडून नेल. तसेच त्यांच्या बाजूला शेती करणारे संजय काळुणे यांच्याही शेतातील टोमॅटो चोरीला गेले आहे. रविवारी (दि. २०) रात्रीच्या वेळेस आडगाव रस्त्यावरील संजय घुमरे यांच्या मळ्यातील चोरट्यांनी कुलूप तोडून ट्रॅक्टरच्या ब्लोर चे सर्व पितळी फुले व ट्रॅक्टरच्या पेटीचे लॉक तोडून स्प्रे गन चोरुन नेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या परिसरातील भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.
टोमॅटोला जास्त भाव असल्याने भुरटे चोर टोमॅटो तोडून नेत आहे. आम्ही पोटच्या मुलासारखे जपून टोमॅटोला जगवले. टोमॅटो या पिकाला लाखो रु पये खर्च केले आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे अनेक महागडी औषधे फवारणी केले आहेत. त्यातच भुरटे चोर आमच्या शेतातील टोमॅटो चोरी करतात. त्यामुळे आम्हाला रात्रीच्या वेळेस शेतात चकरा मारावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी या चोरांचा लवकरच बंदबोस्त करावा.
-विलास वाघ, शेतकरी, जानोरी.
द्राक्ष बागाचे नुकतेच काम सुरू केले होते. परंतु भुरट्या चोरांनी माझ्या घरातील औषधे फवारणीचे ट्रॅक्टरचे ब्लोरचे पितळी फुले व इतर साहित्य चोरून नेल्याने शेतीचे काम खोळंबले आहे. पावसाने अगोदरच परेशान केले आहे. त्यातच आमच्या शेतातील साहित्याच्या चोºया होत असल्यामुळे कोणाकडे दाद मागायची. पोलिसांनी या चोरांचा बंदोबस्त करावा.
- संजय घुमरे, शेतकरी, जानोरी.