चांदवडला भाजपा आमदार राम कदमांच्या निषेधार्थ पुतळादहन,मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 05:55 PM2018-09-06T17:55:17+5:302018-09-06T17:55:37+5:30

चांदवड - महिलासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार राम कदमांच्या निषेधार्थ चांदवड तालुका कॉग्रेस कमेटी व महिलांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ जमा होऊन तेथून घोषणा देत मोर्चा काढला .

Putladhan, Morcha, protest against BJP MLA Ram Kadam on Chandwad | चांदवडला भाजपा आमदार राम कदमांच्या निषेधार्थ पुतळादहन,मोर्चा

चांदवडला भाजपा आमदार राम कदमांच्या निषेधार्थ पुतळादहन,मोर्चा

googlenewsNext

चांदवड - महिलासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार राम कदमांच्या निषेधार्थ चांदवड तालुका कॉग्रेस कमेटी व महिलांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ जमा होऊन तेथून घोषणा देत मोर्चा काढला . तर राम कदमाचा फोटो लावलेला पुतळा घेऊन सर्व महिला पुरुष बसस्थानकासमोर आले. त्यामुळे सुमारे वीस मिनीटे दोन्ही बाजुची वाहतुक खोळबंली होती. नेतृत्व माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, नगराध्यक्ष रेखा गवळी, नगरसेवक सौ. मीनाताई कोतवाल, नगरसेवक लीलाबाई कोतवाल, चांदवड तालुका कॉँग्रेस अध्यक्ष संजय जाधव, कार्याध्यक्ष समाधान जामदार, भीमराव जेजुरे,राहुल कोतवाल, नंदकुमार कोतवाल व महिलांनी केले. राम नव्हे तर रावण कदम हाय! हाय! कदम यांचा निषेध असो , राम कदम यांनी राजीनामा द्याव्यात अशा घोषणा देत असंख्य महिला व मुलींनी राम कदम यांच्या पुतळ्यावर लावलेल्या फोटोला जोडे मारले. व बसस्थानकासमोर अनेक महिला व कार्यकर्त्यांनी हा पुतळा पेट्रोल टाकून जाळला तर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल म्हणाले की,भाजपा आमदार राम कदम यांनी महिलाबाबत अपशब्द काढले , मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा व त्यांना शासन करावे अशी मागणी केली.तर याबाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कोतवाल यांनी दिला. मुख्यमंत्री,प्रांताधिकारी, तहसीलदार , पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले.यावेळी नंदु चौधरी,विजय कुंभार्डे, शिवाजी बर्डे,डॉ.प्रविण घंगाळे, विश्वनाथ ठोके, उत्तमराव ठोंबरे,संकेत पारवे, राजेंद्र गिडगे, शिवाजी कासव,अनीष शहा, भाऊसाहेब गोसावी, सागर नवले, राहुल जमदाडे, भाऊसाहेब शेलार, सोसायटीचे सभापती सुभाष शेळके, भाऊसाहेब मापारी, बापू शिंदे ,सोनाली क्षत्रिय, शीतल देवरे,मनिषा ठाकरे, करुणा पाटील, ज्योती जाधव, सुनीता देशमुख, स्वाती कोतवाल, मेघा चव्हाण, संगीता कोतवाल,संगीता अहेर,हर्षला पवार,मेधा निकम, मनिषा जाधव, रुपाली चव्हाण,उषा बच्छाव, आदिसह महिला मुली उपस्थित होत्या.पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जगताप व पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Web Title: Putladhan, Morcha, protest against BJP MLA Ram Kadam on Chandwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.