फेब्रुवारीत होणार प्यारा परिवार सिंधी मॅरेज मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:11 AM2021-01-09T04:11:31+5:302021-01-09T04:11:31+5:30
नाशिक : सिंधी समाजाच्या वतीने प्यारा परिवार सिंधी मॅरेज मेळाव्याची घोषणा करण्यात आली असून, कोरोनाच्या संकटातून परिस्थिती पूर्वपदावर येत ...
नाशिक : सिंधी समाजाच्या वतीने प्यारा परिवार सिंधी मॅरेज मेळाव्याची घोषणा करण्यात आली असून, कोरोनाच्या संकटातून परिस्थिती पूर्वपदावर येत असताना समाजातर्फे सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून फेब्रुवारी २०२१ मध्ये हा मेळावा घेतला जाणार असल्याची माहिती समाज प्रतिनिधींनी दिली आहे.
नाशिकमध्ये होणाऱ्या सिंधी समाजाच्या मेळाव्याची तारीख व ठिकाण लवकर निश्चित केले जाणार असून, सहभागासाठी विवाहोच्छुक वधू-वराच्या पालकांनी प्यारा परिवार, नाशिक सिंधी समाज मॅरेज ब्यूरोच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या या मेळाव्यात वय वर्ष २५ ते ३५ वयोगटातील उच्चशिक्षित उमेदवार सहभागी होणार असल्याने वधू-वरांचा शोध घेणाऱ्या पालकांना ही सुवर्णसंधी ठरणार आहे. मात्र, मेळाव्यात मर्यादित प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती प्यारा परिवारचे श्याम मोटवानी, ॲड. प्रकाश आहुजा, महेश नागपाल, रितिका कलानी, ॲड. भारती कटारिया, देवी दीदी, प्रकाश मनवाणी, सतीश पंजवानी, दीपू आहुजा, हेमंत भोजवानी, सुनील केसवानी यांनी दिली आहे.