शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:58 PM2018-07-15T23:58:33+5:302018-07-16T00:12:15+5:30
नाशिक : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या शहरातील विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना मध्य नाशिकतर्फे रविवारी (दि़१५) खासदार हेमंत गोडसे, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, डॉ़अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्याहस्ते गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये सत्कार करण्यात आला़

विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना खासदार गोडसे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत मात करून तुम्ही मोठे यश संपादन केले आहे़ यापुढेही एमपीएससी, युपीएससीच्या स्पर्धापरीक्षा देऊन अधिकारी व्हा व आपल्या कुटुंबाचे व नाशिकचे नाव मोठे करा़ नाशिकला युपीएससी परीक्षेचे केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हे केंद्र मिळेल असे गोडसे यांनी सांगितले़ भद्रकालीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी व डॉ़ अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते शहरातील रमाबाई आंबेडकर विद्यालय, सारडा सर्कल यासह विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, जयंत दिंडे, सचिन मराठे, महेश बडवे, नाना काळे, नगरसेवक श्यामला दीक्षीत, ज्योती देवरे, मंगला भास्कर यांसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते़