कर्मचारी पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:40 AM2018-09-10T01:40:14+5:302018-09-10T01:40:22+5:30
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे रविवारी (दि.९) सभासदांच्या गुवणंत पाल्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे रविवारी (दि.९) सभासदांच्या गुवणंत पाल्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष मधुकर आढाव, उपाध्यक्ष किशोर वारे, सचिव नितीन भडकवाडे, संचालक विजयकुमार हळदे, राजेंद्र भागवत, पंडित कटारे, गोटीराम खैरनार, भाऊसाहेब पवार, नितीन पवार, पांडुरंग वाजे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या दहावी, बारावी, उच्चशिक्षण, तंत्र व वैद्यकीय शिक्षणाच्या विविध विद्याशाखांमध्ये उत्कृष्ट गुणांसह चमकदार कामगिरी करणाºया सुमारे ११० पाल्यांचा नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतंसस्थेतर्फे रविवारी सत्कार व सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे संचालक अमित आडके, संदीप दराडे, विक्रम पिंगळे, विमल घोडके , मंगला बोरसे आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यार्थी व संस्थेचे सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक मधुकर आढाव यांनी केले. सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले. नितीन भडकवाडे यांनी अभार मानले.