भारतीय जैन संघटनेतर्फे गुणवंतांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 05:56 PM2019-07-01T17:56:45+5:302019-07-01T17:57:17+5:30
येवला : येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी चांदवड येथे शिकत असलेली नेहा संघवी हिने डिझाईन अँड डेकोरेशन या अभ्यासक्र मात ८०.३० टक्के गुण संपादन केले. तसेच बारावी परीक्षेत मानस बंब याने ७४ टक्के गुण, प्रेरणा शिंगी हिने ८५ टक्के गुण, विभुती कासलीवाल व सेजल भाटी यांनी ५५ टक्के गुण मिळवले. दहावीच्या परीक्षेत जय कासलीवाल याने ८३ टक्के गुण, यश समदडीया याने ८४ टक्के, साईल मंडलेचा ७२ टक्के गुण मिळवून यशस्वी झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश भंडारी, शहर अध्यक्ष अरु ण सोनी, सतिष समदडीया, मदनलाल चंडालिया यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्र माची सुरुवात नवकार महामंत्राने करण्यात आली. कार्यक्र मास रविंद्र बाफणा, विजय संचेती, आशिष शिंगी, जितेश जैन, राजेश संघवी, दिनेश संचेती, कांतीलाल गादिया, प्रविण श्रीश्रीमाळ, पुष्पाबाई संघवी, निलेश भाटी उपस्थित होते. सुत्रसंचालन मदनलाल चंडालिया यांनी केले.