गुणवत्ता सुधार : सद्यस्थितीत ३३ शाळांनी गाठले लक्ष्य महापालिकेच्या ७३ शाळा वर्षाअखेर ‘अ’ श्रेणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:06 AM2017-12-01T00:06:42+5:302017-12-01T00:10:41+5:30
महापालिका शाळांची गुणवत्ता व दर्जाबाबत नाके मुरडणाºयांना आश्चर्याचा धक्का बसावा अशी कामगिरी शाळांकडून सुरू असून, शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ’च्या धोरणानुसार ‘शाळासिद्धी’ अंतर्गत महापालिकेच्या ३३ शाळा ‘अ’ श्रेणीत जाऊन पोहोचल्या आहेत.
नाशिक : महापालिका शाळांची गुणवत्ता व दर्जाबाबत नाके मुरडणाºयांना आश्चर्याचा धक्का बसावा अशी कामगिरी शाळांकडून सुरू असून, शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ’च्या धोरणानुसार ‘शाळासिद्धी’ अंतर्गत महापालिकेच्या ३३ शाळा ‘अ’ श्रेणीत जाऊन पोहोचल्या आहेत.
डिसेंबर २०१७ अखेर त्यात आणखी ४० शाळांची भर पडणार असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात असून, फेब्रुवारी २०१८ अखेर सर्वच्या सर्व १२७ शाळाही ‘अ’ श्रेणीबद्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या एकूण १२७ शाळा आहेत. ‘शाळासिद्धी’ अंतर्गत १२५ गुणांची परीक्षा घेतली जाते. महापालिकेच्या शिक्षण विभागाने शासनाच्या धोरणानुसार गुणवत्ता कक्ष स्थापन केला होता. त्यानंतर एक थीम तयार करून प्रत्येक शाळाला एक तक्ता देण्यात आला. सदर तक्त्यानुसार त्या-त्या शाळांनी स्वयंमूल्यमापन केले. त्यामध्ये ८० पेक्षा अधिक गुण मिळविणाºया ५ शाळा आढळून आल्या. ज्या शाळांना ८० च्यावर गुण मिळतात त्या शाळा ‘अ’श्रेणीमध्ये पोहोचतात. त्यानंतर मनपाच्या शिक्षण विभागाने ७० ते ८० गुण मिळविणाºया २३ शाळांकडे लक्ष केंद्रित केले. त्यांना पंधरा दिवसांचा कार्यक्रम आखून देण्यात आला असता त्यांनी लक्ष्य गाठले आणि या २३ शाळाही ‘अ’ श्रेणीत जाऊन पोहोचल्या. आतापर्यंत मनपाच्या ३३ शाळांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झालेली आहे. ५० ते ७० या दरम्यान गुण मिळविणाºया ४० शाळा असून, त्यांच्याकडे आता लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सदर शाळा डिसेंबर २०१७ अखेर ‘अ’ श्रेणीपर्यंत जाऊन पोहोचतील, असा विश्वास मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेच्या सर्वच्या सर्व शाळा गुणवत्तेच्या दृष्टीने सक्षम करण्याचा प्रयत्न आकाराला येत असल्याचेही उपासनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.